शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल.गुलाम ताहेर नासिर हुसैन यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित...


 शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल.गुलाम ताहेर नासिर हुसैन यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व समर्पित कार्य करणारे गुलाम ताहेर नासिर हुसैन, शिक्षक, गर्ल्स उर्दू हाय स्कूल, अकोट, जिल्हा अकोला यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आले.विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यामध्ये वाचनाची आवड, आत्मविश्वास, सर्जनशील विचार, सामाजिक जाणीव आणि आधुनिक शिक्षणाची दृष्टी निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान देण्यात आला.12 सप्टेंबर 2026 रोजी स्वयंभू महादेव रिसॉर्ट, अकोली मार्केट, बालापूर, जि. अकोला येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात गुलाम ताहेर नासिर हुसैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, पदवीधर मतदारसंघाचे आमदार पंकज लिंगाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तायडे जी तसेच काँग्रेस शिक्षक सेलचे पदाधिकारी यांच्या हस्ते गुलाम ताहेर नासिर हुसैन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्यातील सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणामध्ये प्रभावी वापर व्हावा, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत.या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे अकोट तालुक्यासह अकोला जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव झाला असून, शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून गुलाम ताहेर नासिर हुसैन यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post Next Post