राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी..
मेळघाटातील मातामृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना टेंभ्रूसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात पंधरा दिवसांत दुसरा मातामृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मोझरी येथील अर्चना अजय धिकार या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू प्रसूती नंतर झाल्याने मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली आहे.
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील टेंभ्रूसोंडा आरोग्य केंद्रा अतर्गत येणाऱ्या मोझरी गावातील अर्चना धिकार या महिलेचा प्रसूती झाल्यानंतर ता.११ सप्टेबर रोजी मृत्यु झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विशेष म्हणजे पंधरा दिवसापूर्वी सती गावातील गर्भावती मातेचा मृत्यु झाला होता त्या मृत्युची चौकशी पूर्ण झाली नसतांना आता पुन्हा एकदा मोझरी गावातील मातेचा मृत्यु झाला आहे या मृत्युच्या बाबतीत आरोग्य केंद्राकडून कमालीची गुप्तता बाळगल्याचे दिसून आले मेळघाटात दरवर्षी माता तथा बालमृत्यू होते त्यानंतर चौकशी सुद्धा होते मात्र त्या चौकशीत काहीच निष्पण होत नसल्याचे आजवरचा अनुभव आहे त्यामुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मातामृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय कारणे सांगून प्रकरणे संपविण्यापेक्षा गर्भवतीची वेळेवर तपासणी झाली होती का, धोक्याची लक्षणे ओळखली होती का, संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य पाठपुरावा केला का आणि संदर्भ सेवा वेळेत मिळाली का, याची चौकशी होणे आवश्यक आहे विशेष म्हणजे मातामृत्यू रोखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर वारंवार प्रश्न उपस्थित होत असतानाही जबाबदारी निश्चित होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे प्रत्येक मातामृत्यूला केवळ वैद्यकीय गुंतागुंत म्हणून मोकळे होण्याची पद्धत थांबवून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्याची वेळ आली आहे आरोग्य केंद्रातील नोंदी, गर्भवतींच्या तपासण्या, आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा, रेफरल प्रक्रिया आणि रुग्णवाहिका उपलब्धतेची सखोल चौकशी करावी चौकशीत कर्तव्यात कसूर किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे मातामृत्यू रोखण्यासाठी योजना कागदावर आणि माता मृत्यूच्या दारात.अशी परिस्थिती असेल तर शून्य मातामृत्यूचे उद्दिष्ट कधी साध्य होणार? हा प्रश्न आता मेळघाटातील नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
........आरोग्य यंत्रणा कुठे चुकतेय?
मेळघाटात दरवर्षी बालमृत्यू आणि मातामृत्यूच्या घटना घडत असताना आरोग्य यंत्रणा नेमकी करतेय तरी काय? शासनाच्या कोट्यवधींच्या योजना, आरोग्य शिबिरे आणि कागदोपत्री उपाययोजना असूनही दुर्गम भागातील आदिवासी माता बालकांच्या जीवाचा प्रश्न कायम आहे आरोग्य केंद्रे आहेत पण पुरेसे डॉक्टर नाहीत रुग्णवाहिका आहेत, पण वेळेवर उपलब्धता नाही योजना आहेत पण त्यांचा लाभ गरजूंपर्यंत किती पोहोचतो हा गंभीर प्रश्न आहे मग या अपयशाची जबाबदारी नेमकी कोणाची?गर्भवती मातांना वेळेवर उपचार मिळत नसतील आणि नवजात बालकांचे जीव वाचवण्यात यंत्रणा अपयशी ठरत असेल तर केवळ कागदावरील आकडे आणि बैठका कशासाठी? मेळघाटातील बालमृत्यू आणि मातामृत्यू थांबवण्यात अपयशी ठरणाऱ्या व्यवस्थेचे उत्तरदायित्व निश्चित करून कठोर कारवाई होणार का? मेळघाटातील माता-बालकांचा जीव हा आकडा नाही त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा जाब घेण्याची वेळ आता आली आहे
_____________________________
सदर मातेची प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली मात्र प्रसूती नंतर अधिक रक्तस्त्राव झाल्याने पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यु झाला.
:-डॉ शुभम झाडोकार, समुदाय आरोग्य अधिकारी, कुलंगना खुर्द
