चिमुकल्या हातांनी साकारला ‘गणराया’; सातपुडा कॉन्व्हेंटच्या लिटिल चॅम्प्सची कलाकृती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू.!


 चिमुकल्या हातांनी साकारला ‘गणराया’; सातपुडा कॉन्व्हेंटच्या लिटिल चॅम्प्सची कलाकृती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू.!

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

गणेशोत्सवाच्या उत्साहात भक्ती, कल्पकता आणि कलाविष्काराचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे. सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्स, जळगाव जामोद येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना उजाळा देत श्री गणेशाची मनमोहक कलाकृती साकारली आहे.लिटिल चॅम्प्सनी एकजूट, शिस्त, सर्जनशीलता आणि भक्तीभाव यांचा सुंदर मिलाफ साधत ही आकर्षक गणेशरचना साकारली. चिमुकल्या कलाकारांच्या कल्पकतेतून साकारलेली श्री गणेशाची प्रतिकृती पाहताना विद्यार्थ्यांमधील कलात्मकता आणि संघभावना प्रकर्षाने जाणवते.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा आणि त्यांच्यामध्ये संघकार्य, शिस्त, आत्मविश्वास व सर्जनशील विचारांची जडणघडण करणारा उपक्रम ठरत आहे. सातपुडा कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीतून याच भावनेचे सुंदर दर्शन घडविले.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या सुंदर कलाकृतीचे पालक, शिक्षक तसेच नागरिकांकडून कौतुक होत असून, ‘लिटिल चॅम्प्स’च्या या कलाविष्काराने गणेशोत्सवाच्या आनंदात आणखी रंग भरला आहे.

Previous Post Next Post