सय्यद शकिल/अकोट तालुका (प्रतिनिधी);
आगामी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी, अकोला यांच्या आदेशान्वये डीजे, डॉल्बी साऊंड तसेच मॉडिफाइड साऊंड सिस्टीमच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.याबाबत अकोट येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत माननीय पोलीस अधीक्षकांनी गणेश मंडळे, पदाधिकारी व नागरिकांना कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले.विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणीही डीजे अथवा डॉल्बी साऊंडचा वापर करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शातता समितीच्या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अकोट पोलीस उपविभागीय अधिकारी निखिल पाटील उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर अकोटचे तहसीलदार सुनील चव्हाण मुख्याधिकारी शशिकांत बाबर अकोट शहर चे ठाणेदार किशोर जुनघरे अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे सह गणेशो मंडळ शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
