जळगाव जामोद(प्रतिनिधी):
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त जळगाव जामोद केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आज, २५ सप्टेंबर रोजी ब्रेन डेव्हलपमेंट स्कूल येथे विशेष आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष तुषार पाटील,सचिव मनोज वानखडे व प्रसिद्धी प्रमुख उमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध आरोग्यविषयक विषयांवर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील आरोग्याची काळजी, स्वच्छता,औषधांचा योग्य वापर तसेच आरोग्यविषयक आवश्यक बाबींविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.या कार्यक्रमासाठी ब्रेन डेव्हलपमेंट स्कूल संस्थेचे अध्यक्ष भूषण मारोडे, मुख्याध्यापिका सौ. मारोडे मॅडम, शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी उपाध्यक्ष शाकीर खान अब्दुल्ला खान, ईसी मेंबर प्रवीण टिकार, ईसी मेंबर रेहान केदार, सहसचिव रवींद्र दातीर, कोषाध्यक्ष सचिन भालतडक, संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अजय पलन तसेच युवा सक्रिय कार्यकर्ते ज्ञानेश्वर भालतडक, तेजस राऊत, वैभव घाटे, निलेश बोपले, गोपाल बडेरे यांच्यासह संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.
