गणरायाला भक्तिभावाने निरोप; जळगाव जामोद शहरात विसर्जन सोहळा शांततेत आणि उत्साहात!१५ सार्वजनिक गणेश मंडळांचा भव्य सहभाग; १५० पोलिस, एसआरपीएफ व होमगार्ड जवानांचा चोख बंदोबस्त...


 गणरायाला भक्तिभावाने निरोप; जळगाव जामोद शहरात विसर्जन सोहळा शांततेत आणि उत्साहात!१५ सार्वजनिक गणेश मंडळांचा भव्य सहभाग; १५० पोलिस, एसआरपीएफ व होमगार्ड जवानांचा चोख बंदोबस्त...

अनिल भगत/जळगाव जामोद...

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद शहरात गणेश विसर्जन सोहळा भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात दिनांक २४ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात आणि जल्लोषात संपन्न झाला. शहरातील १५ सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई, सजावट आणि गणरायाच्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद नगरपरिषदेने नगराध्यक्ष गणेश दांडगे व मुख्याधिकारी सूरज जाधव यांच्या देखरेखीखाली विविध ठिकाणी आरोग्य कॅम्पचे नियोजन केले होते. तसेच नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिरवणूक मार्गावर भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.दरम्यान, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे व तहसीलदार पवन पाटील यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान उपस्थित राहून प्रशासनाच्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पूर्णा नदी पुलावरील विसर्जनस्थळाचीही पाहणी केली. विसर्जनानंतर नदीपात्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात आली.गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त तैनात केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम माछरे व पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणेने नियोजनबद्ध पद्धतीने बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.यावेळी एपीआय नागेश मोहोड, पीएसआय गणेश कायंदे, पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे,पीएसआय स्नेहा शेडगे, गजानन सातव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर, दिपमाला वानखडे, दिपक निकम, इरफान शेख, शांतीलाल धिरबस्सी, सचिन राजपूत, निलेश पुंडे, बाळकृष्ण पवार, अयुब शेख, मधुकर गाढे, प्रशांत डांमरे, अर्जुन पडोळ, बाळकृष्ण डुकरे, सुपाजी तायडे, सतीश पाटोळे, अतुल नायसे, सुजित डाबेराव, महिला कॉन्स्टेबल आमले यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाचे जवान व होमगार्ड असा सुमारे १५० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.गणेश मंडळे, प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि नागरिकांच्या समन्वयामुळे संपूर्ण विसर्जन सोहळा कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. त्यामुळे जळगाव जामोद शहरातील गणेश विसर्जन सोहळ्याने शांतता, सामाजिक सलोखा आणि उत्साहाचा आदर्श निर्माण केला.

Previous Post Next Post