नागापुर येथिल होत असलेल्या रस्त्यावरचा नाली बांधकामावर माती मिक्स चोरीचा रेतीचा वापर...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
मेळघाटात पुष्कळ गावाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे व इतर विभागातील बांधकाम सुरू आहे.त्याच प्रमाणे चिखलदरा तालुक्यातील नागापुर या गावाच्या झालेल्या काॅक्रेंट रस्त्याच्या बाजुने सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाली बांधकाम सुरू असुन या बांधकाम वर सर्रास नाल्या खोल्या मधिल माती मिक्स चोरीचा रेतीचा वापर होत असल्याचे चित्र दिसून आले आहे.याला जबाबदार कोण असा प्रश्न नागापुर येथिल वासियांचा आहे.तसेच या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकही इंजिनिअर किंवा कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने येथील कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने आपली मनमानी करीत असल्याचे चित्र दिसून आले आहे.काही दिवसांपूर्वी नागापुर पासुन ते वडापाटीच्या गावाच्या जवळपास पर्यंत काॅक्रेंट रस्त्याचे काम झाला परंतु हा बांधकाम पण अधिकाराच्या आशिर्वादाने एकदम भोंगळ रित्या असल्याचे दिसून येते.
---------------------------
नागापुर येथिल होत असलेले नाली बांधकाम हा अधिकाराच्या आशिर्वादाने एकदम भोंगळ रित्या होत आहे.मि कंत्राटदाराला म्ह्टले आहे.की तु चोरीची माती मिक्स रेतीचा वापर करीत आहे.या कामावर कन्नंची रेतीचा वापर कर अन्यथा या कामाची तक्रार मि जिल्हाधिकारी अमरावती येथे करणार आहे.
सुजित भास्कर
सरपंच
ग्रामपंचायत नागापुर
