‘वोट चोर, गद्दी छोड’च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले!मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मुखवट्याला बेड्या ठोकत काँग्रेसचा आक्रमक निषेध...


 ‘वोट चोर, गद्दी छोड’च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले!मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मुखवट्याला बेड्या ठोकत काँग्रेसचा आक्रमक निषेध...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:

 मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीसह निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांबाबत प्रश्न उपस्थित करत बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘वोट चोर, गद्दी छोड’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा मुखवटा परिधान केला होता.या आंदोलकाला प्रतीकात्मक स्वरूपात बेड्या ठोकून काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आपला निषेध व्यक्त केला.निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत नागरिकांच्या मनात विविध प्रश्न व चिंता निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसने आपल्या निवेदनातून केला. या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच त्यांच्या कार्यकाळाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.या आंदोलनात डॉ. अरविंद कोलते, माजी आमदार राजेश एकडे, दत्ता काकस, तुळशीराम नाईक, जयश्रीताई खाकरे, इरफान पठाण, प्रमोद पाटील,जाकीर कुरेशी, स्वप्नील ठाकरे, किशोर अप्पा भोसले,वसीमोद्दीन,सतिष टाकळकर,अजहर देशमुख, बबलू पठाण, गौरव पाटील,अच्छेखाँ पठाण, श्रीकृष्ण केदार,यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी आणि निषेधाच्या माध्यमातून काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

Previous Post Next Post