बुलढाण्यात आ.संजय गायकवाड यांच्या नियोजनात बैलपोळा उत्साहात; असंख्य कास्तकारांचा सन्मान..!जुनागाव परिसरातील शेतकऱ्यांचा पांढरी टोपी, रुमाल व श्रीफळ देऊन केला गौरव;


 बुलढाण्यात आ.संजय गायकवाड यांच्या नियोजनात बैलपोळा उत्साहात; असंख्य कास्तकारांचा सन्मान..!जुनागाव परिसरातील शेतकऱ्यांचा पांढरी टोपी, रुमाल व श्रीफळ देऊन केला गौरव;

बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी....

बुलढाणा शहरातील जुनागाव परिसरात शेतकरी आणि सर्जा-राजाच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेला बैलपोळा सण हजारोंच्या जनसागराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. माझ्या नियोजनातून आयोजित या भव्य पोळा सोहळ्यात जुनागाव तसेच परिसरातील असंख्य कास्तकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.बैलपोळ्यानिमित्त सर्वप्रथम आ.संजय गायकवाड यांच्या निवासस्थानी सर्जा-राजाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पूजाताई संजय गायकवाड यांच्यासह परिवारातील माता-भगिनी उपस्थित होत्या. पारंपरिक पद्धतीने सर्जा-राजाचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.वर्षभर शेतामध्ये कष्ट करून अन्नधान्य पिकविणाऱ्या कास्तकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत जुनागाव तसेच परिसरातील असंख्य शेतकरी बांधवांचा पांढरी टोपी, रुमाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शेतकरी हा समाजाचा अन्नदाता असून, त्यांच्या कष्टाचा आणि घामाचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.यानंतर जुनागावातील निलेश वैद्य यांच्या घरून निघणारी मानाची गुढी वाजत-गाजत जुनागाव वेशीवर आणण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.जुनागाव वेशीवर दाखल झाल्यानंतर आ.गायकवाड यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास आलेल्या बळीराजा स्मारकावर बळीराजाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मानाच्या गुढीचा बैलाच्या माथ्याला स्पर्श करून पारंपरिक पोळा सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.हजारोंच्या संख्येने नागरिक, शेतकरी आणि कास्तकार बळीराजा स्मारक परिसरात दाखल झाल्याने संपूर्ण जुनागाव परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. महिलांनी शेतकरी बांधवांचे औक्षण करून त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरले ते म्हणजे मानाचे तोरण तोडण्याची पारंपरिक स्पर्धा..! यावेळी असंख्य शेतकरी बांधव आपल्या सर्जा-राजासह सहभागी झाले. हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात गोलू रमेश काळे यांच्या बैलाने मानाचे तोरण तोडून यंदाचा मान पटकावला.दरम्यान, सोहळ्यासाठी आलेल्या शेतकरी बांधवांचे औक्षण नगराध्यक्षा पूजा संजय गायकवाड,मयुरी मृत्युंजय गायकवाड आणि वसुंधरा पृथ्वीराज गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

बैलपोळा हा केवळ सण नाही, तर शेतकरी आणि सर्जा-राजाच्या पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या बाप-लेकासारख्या अतूट नात्याचा, कष्टाचा, मायेचा आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे..!परंपरा जपली… संस्कृती जपली… बळीराजाचा सन्मान केला… अन् अन्नदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली..!यावेळी बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजयभैय्या गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराजभैय्या गायकवाड, दिलीप गायकवाड, किशोर गायकवाड, विलास गायकवाड, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुमरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, नगरपालिका उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, मल्हारी गायकवाड, सचिन गायकवाड, शिवसेना उपशहरप्रमुख अरुण ढोरे, जीवन उबरहंडे, नगरसेवक मोहन पऱ्हाड, गजानन मुट्ठे, गोविंदराव चिंचोले, संजय काकडे, संतोष घुले, गजानन खांडवे, गजानन देशमुख, अशोक गवादे, रामेश्वर गाडेकर, दत्तात्रय गाडेकर, शिवाजी गाडेकर, संतोष तुपकर, मधुकर राऊत, पांडुरंग घटते, श्याम घाटे, अशोक वावरे, भगवान व्यवहारे, श्रीकृष्णा शिंदे, श्याम पवार, अनंता लहासे, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे, संतोष गावंडे, विक्रम घुले, रमेश काळे, गजानन पायगव्हाण, विष्णू पायगव्हाण, रामेश्वर काळे, वीरेंद्र जैन, तुकाराम वावरे, गजानन मिरगे, संजय मिरगे, रमेश राऊत, राजेश बरडे, एकनाथ मुट्ठे, राहुल सोळंके, विलास वरपे, उमेश वाघमारे, सुनील वरपे, मंगेश वाघमारे, भैय्या शेळके, शुभम वरपे यांच्यासह असंख्य शेतकरी व कास्तकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.हजारोंच्या जनसागरात साजरा झालेला हा बैलपोळा सोहळा परंपरा, संस्कृती, शेतकरी सन्मान आणि कृतज्ञतेचा सुंदर संगम ठरला..! शेतकरी आणि सर्जा-राजाचे हे बाप-लेकासारखे नाते पुढील पिढ्यांपर्यंत असेच जपले जावे आणि बळीराजाच्या जीवनात सदैव सुख-समृद्धी नांदावी, हीच अशी भावना आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.

Previous Post Next Post