जळगाव जामोद(प्रतिनिधी);
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक व्यवहारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, बचत व गुंतवणुकीचे महत्त्व समजावे आणि आर्थिक नियोजनाची संवय लागावी,या उद्देशाने 8 सप्टेंबर रोजी साक्षरता दिनानिमित्त वित्तीय साक्षरता कार्यशाळा संपन्न झाली.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ.प्रशांत पिसोडकर व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. ऋषिकेश विप्रदास होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. ऋषिकेश विप्रदास यांनी वित्तीय साक्षरतेची स्थिती कशी चालवावी व दैनंदिन जीवनात वित्तीय साक्षरतेचे महत्त्व काय आहे?तसेच विद्यार्थ्यांनी आर्थिक बाबतीत जागृत राहणे का आवश्यक आहे? याबाबत माहिती दिली.प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ प्रशांत पिसोळकर यांनी वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन केले व राष्ट्रीय वित्तीय शिक्षा केंद्र याबद्दल सविस्तर माहिती देत आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातून खर्च आणि बचत कसे करायचे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. वेळेनुसार पैशाची किंमत काय असते तसेच शेअर मार्केट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये सुरक्षितता, वाढ, तरलता या तीन गोष्टींचा आधारस्तंभ घेऊन गुंतवणूक कशी करावी हे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.गिरीश मायी यांनी वित्तीय साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी केवळ उत्पन्न मिळवणे पुरेशी नसून त्या उत्पन्नाची योग्य नियोजन, बचत आणि गुंतवणूक करणे हे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.यावेळी प्रा. विनोद बावस्कर, प्रा. रामेश्वर सायखेडे , प्रा. सचिन उनडकाट, प्रा. विनय उमरकर, प्रा. आकाश निलजे, प्रा. गोपाल भड, प्रा. नीलिमा भोपळे यांचेसह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन स्नेहल भोपळे यांनी केले तर आभार प्रदर्शन निकिता हागे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते रित्या गजानन वानखडे , समाधान निलजे, हर्षद धर्मे व अभ्यास मंडळाच्या सदस्य विदयार्थ्यांनी परिश्रम घेतले.
