सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी..
"रक्तदान हेच श्रेष्ठ दान आणि जीवनदान" या उदात्त विचाराने प्रेरित होऊन रॉयल गृप गणेशोत्सव मित्र मंडळ दे साखरशा च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे महिलांनाही या उपक्रमात सहभाग नोंदवला.गणेशोत्सवाच्या आनंदात सामाजिक भान जपत रॉयल ग्रुपने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. "रक्तदान हेच श्रेष्ठदान" हा संदेश देत आयोजित केलेल्या या शिबिराला गावातील रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
सामान्यतः रक्तदान शिबिरांमध्ये महिलांचा सहभाग नसतो, परंतु या शिबिरात सौ.काजल रामदास राठी या महिलेने रक्तदान करून इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या या धाडसी आणि सामाजिक जाणीवेच्या निर्णयाचे उपस्थितांनी कौतुक केले. सकाळी उद्घाटनप्रसंगी रतनशेठ दुगड, अनंत आघाव(ग्रामविकास अधिकारी), गजानन पाचपोर(पो.पा), रितेश दुगड, डॉ.हेमराज राठी, डॉ. अमोल पाचपवार, प्रमोदबापू देशमुख, डॉ.स्नेहा गायकवाड, मनोज देशमुख, सुधाकर गायकवाड, जिवन देशमुख, डिगांबर कान्हेड, गजानन बलांसे, शे.अबरार, कृष्णा चव्हाण,जगदीश चव्हाण यांची उपस्थिती होती. तर संगपाल तिडके, रामदेव राठी, काजल राठी, सचिन कान्हेड, नरेश साठे, हितेश दुगड, पुरुषोत्तम चवरे, दिपक गायकवाड, प्रभु चव्हाण, कृष्णा पारसकार, गोपाल बुंधे, गोपाल सुर्वे, शे.साहिल शे.रफीक, रेहान कुरेशी, रितेश रत्नपारखी, अक्षय गायकवाड, अभीजीत बलांसे, आकाश नवत्रे, यश बेगाणी, ओम सोनुने, कृष्णा गायकवाड, ऋषीकेश गायकवाड, कुणाल गायकवाड, प्रसन्न गायकवाड, नागेश गायकवाड, धनंजय गायकवाड, रवी अल्हाट, यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी रक्तादान करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. तसेच कार्तिक गायकवाड, सत्यम बलांसे, पवन अल्हाट, प्रसाद गायकवाड, दर्शन बघे, योगेश सोनुने, प्रशांत अल्हाट,गजानन नहार, प्रतिक गायकवाड, शरद बोरचाटे, संकेत गायकवाड, राहुल गायकवाड, ऋषी भोने,शुभम गायकवाड, निखिल अल्हाट, सौरभ गायकवाड या सर्व मंडळांच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. बळीराजा ब्लड बॅंक,मेहकर या रक्त संकलन केंद्रा कडून रक्त संकलन करण्यासाठी संदेश राठोड, माधव कोरडे, पवन जाधव, कार्तिक जाधव, जान्हवी तितिरमारे यांनी योगदान दिले. आलेल्या संकलन केंद्रातील सदस्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान यावेळी करण्यात आला. सकाळपासूनच शिबिराच्या ठिकाणी रक्तदानासाठी तरुणांची आणि ग्रामस्थांची गर्दी झाली होती. गावकरी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिळून हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. रॉयल ग्रुप गणेशोत्सव मित्र मंडळाच्या या सामाजिक आणि कौतुकास्पद उपक्रमाचे देऊळगाव साकरशा परिसरातून आणि सर्व स्तरातून जोरदार स्वागत व कौतुक केले जात आहे.
