सेवा संकल्प अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद...


 सेवा संकल्प अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

भारतीय जनता पार्टीच्या वतीने  माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त चालू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला शहरातील महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेत सहभागी महिलांनी भारतीय संस्कृती, राष्ट्रभक्ती, स्वच्छ भारत, बेटी बचाव बेटी पढाव,आवास योजना, विकसित भारत आणि सामाजिक जनजागृती अशा विविध विषयांवर सुंदर व आकर्षक रांगोळ्या साकारल्या. आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून स्पर्धकांनी सामाजिक संदेश देत उपस्थितांची मने जिंकली.

स्पर्धेतील उत्कृष्ट रांगोळी साकारणाऱ्या विजेत्या व सहभागी स्पर्धकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये प्रथम क्रमांक प्रणिता मोहन ढगे,द्वितीय क्रमांक कु. प्राजक्ता बावसकर, तृतीय क्रमांक धनश्री संतोष काळपांडे, चतुर्थ क्रमांक हा 2 महिलांना देण्यात आला त्यामध्ये शोभा विजय मिसाळ,गीता अनिल हिस्सल याप्रमाणे हे या स्पर्धेमध्ये विजेते राहिले आणि या स्पर्धेमध्ये जवळपास 30 स्पर्धकांनी भाग घेतला होता बाकी राहिलेल्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून गिफ्ट देण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून, सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे कार्य करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक म्हणून गावंडे सर,अनिल घोपे सर,पवन बोंबटकर सर यांची उपस्थिती लाभली.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा सुनीता म्हसाळ, रांगोळी स्पर्धेच्या संयोजिका वंदनाताई चव्हाण, सह संयोजिका व महिला बाल कल्याण सभापती प्रियांकाताई येऊल, नगरसेविका पुष्पाताई अंबडकार, नगरसेविका रुपालीताई डोबे, नगरसेविका लताताई तायडे व भाजपा महिला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post