अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रा.अदिती ऋषिकेश पोहेरे यांचे नामांकन अर्ज दाखल...


 अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रा.अदिती ऋषिकेश पोहेरे यांचे नामांकन अर्ज दाखल...

राजु भास्करे/अमरावती...

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहेरे यांचा नामांकन अर्ज मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दाखल करण्यात करण्यात आला.नामांकन अर्ज दाखल करतेवेळी अमरावती येथील उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते डॉ.पंजाबराव देशमुख पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण करून नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.अमरावती विभागातील शिक्षक मतदारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी तसेच शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक परिवर्तनासाठी प्रा. अदिती ऋषिकेश पोहेरे यांना काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे.या नामांकन अर्ज दाखल करताना कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपळाळ, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख,माजी मंत्री यशोमतीताई ठाकुर,आमदार माजी मंत्री नितीन राऊत, खासदार बळवंत वानखडे,आमदार साजीद खान पठाण, आमदार अमित झनक, आमदार धिरज लिंगाडे, बुलढाणा जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष प्रकाश पाटिल, माजी आमदार राहुल  बोंद्रे,आदी काँग्रेस पक्षाचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते, शिक्षक बांधव तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post