राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
धर्मजागरण न्यास, विदर्भ प्रांत यांच्या अंतर्गत आयोजित शबरीमाता जयंती रथयात्रेचा शुभारंभ २२ ऑक्टोबर २०२६ रोजी परतवाडा येथील विनोद गुलाबराव चव्हाण यांच्या निवासस्थानी येथुन प्रारंभ झाला असून या रथयात्रेचे गावोगावी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चाना करून रथयात्रेत सहभागी भाविकांनी भक्तिभाव व्यक्त केला.या रथयात्रेच्या पहिल्या दिवशी परतवाडा येथुन बोपापुर, देवगाव,गौलखेडा बाजार ,भिलखेडा,बोराळा,धाडी,गरजधरी,रुईखेड,मार्डी,डागरखेडा,चिचपाणी,पोपटखेड,शिवपुर,राहणापुर,शहापुर,जितापुर,करी,गायरान,चदंनापुर,दिवानझरी,झरी बाजार,वसाडी,चिचारी,आलेवाडी,सायखेड व पिंगळी या गावांमध्ये रथयात्रेचे ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
शबरीमातेच्या भक्तीचा, प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही रथयात्रा गावोगावी पोहोचत आहे. या रथयात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये धार्मिक जनजागृती सामाजिक एकोपा आणि भक्तिभाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.दिवसभरातील गावांमध्ये नागरिक, महिला, युवक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. स्थानिक ग्रामस्थांनी केलेली आरती, पूजाअर्चाना आणि रथयात्रेचे उत्साहपूर्ण स्वागत यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असल्याचे चित्र दिसून आले आहे.भजन, कीर्तन, ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले.शबरीमाता जयंती रथयात्रेमुळे गावोगावी धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक एकता आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आकोट तालुक्यातील जितापुर येथिल भंजन मंडळी म्हणून प्रदिप सोलकर, श्रीकृष्ण सोलकर,नंदु पालवे,देवमन सोलकर व महीला मंडळी यांचा सहभाग लाभला आहे.तसेच या कार्यक्रमाचे आयोजन अजाबराव भास्कर,बारे महाराज, सुनील पवार, अंबादास भास्कर, गणेश भास्कर,गोपाल सुरतने,कमल भास्कर,देवानंद मोरे, गजानन मांडवे आदींनी केला आहे.
