सातपुड्याच्या कुशीतून भिंगाऱ्याच्या खेळाडूंची सुवर्णभरारी! आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केली सर्व खेळाडूंचे कौतुक...


 सातपुड्याच्या कुशीतून भिंगाऱ्याच्या खेळाडूंची सुवर्णभरारी! आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केली सर्व खेळाडूंचे कौतुक...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

नागपूर येथे विदर्भ वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने आयोजित प्रांतस्तरीय एकलव्य क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा, भिंगारा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ९ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ११ पदके पटकावली.या दैदिप्यमान कामगिरी बाबत आज सर्व विद्याथ्यांचे जळगाव जामोद येथील निवासस्थानी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.विशेष म्हणजे सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची ओडिशातील भुवनेश्वर येथे २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या २५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.सातपुड्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर मिळवलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे.या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप बाभुळकर सर, वसतिगृह अधीक्षक केशरसिंग राऊत सर, क्रीडा व्यवस्थापक जोशी सर, अशोक खटिंग सर, प्रशिक्षक सुरपाल चव्हाण सर, के. प्र. नितीन सातव सर, मा. गटशिक्षणाधिकारी जोशी साहेब तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या सर्व पदाधिकारी व मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous Post Next Post