वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून द्विगुणित; प्रशांत मालठाणे यांची श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनला ११ हजारांची मदत!
जळगाव जामोद(प्रतिनिधी);
वाढदिवस म्हणजे केवळ केक कापून आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस नव्हे, तर आपल्या आनंदात समाजातील गरजू व्यक्तींनाही सहभागी करून घेण्याची संधी, ही भावना मनाशी बाळगत दादूलगाव येथील युवा सहकारी श्री. प्रशांत मालठाणे यांनी आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.भाजपा परिवारातील युवा सहकारी असलेल्या प्रशांत मालठाणे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या मदतीतून समाजसेवेचा सकारात्मक संदेश दिला आहे. वैयक्तिक आनंदासोबतच समाजातील गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी हातभार लावण्याची त्यांची भावना इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.आजच्या काळात वाढदिवस आणि विविध समारंभांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र, अशा प्रसंगी सामाजिक कार्यासाठी आर्थिक योगदान देण्याचा उपक्रम समाजाप्रती असलेली संवेदनशीलता, सेवाभाव आणि माणुसकीची जाणीव अधोरेखित करतो. प्रशांत मालठाणे यांनी केलेली ११ हजार रुपयांची मदत ही केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, सामाजिक कार्याला बळ देणारी आणि इतरांनाही समाजहितासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा देणारी आहे.‘स्वतःच्या आनंदात इतरांचाही आनंद शोधणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी!’ या भावनेतून राबविलेला त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या समाजोपयोगी योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यासह भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
