भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खांडवी शाळेत योगाचे धडे!विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक; आरोग्यदायी जीवनासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले...


 भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खांडवी शाळेत योगाचे धडे!विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक; आरोग्यदायी जीवनासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे येथील शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळा, खांडवी येथे एकदिवसीय योग उद्बोधन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.सलीम पटेल, सहसचिव रब्बानी देशमुख, उपाध्यक्ष प्रा. कय्युम पटेल आणि प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. सांगळे यांनी भाऊसाहेब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत योग प्रशिक्षणाला सुरुवात केली. प्रारंभी विद्यार्थ्यांकडून वार्मअप व शरीर संचालनाचे व्यायाम करून घेण्यात आले. त्यानंतर पद्मासन, सिद्धासन, उष्ट्रासन, चक्रासन, गोमुखासन, गरुडासन, बकासन आणि ताडासन अशा विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.महाविद्यालयातील प्रशिक्षित योगिनी विद्यार्थिनी आरती भड, भारती भड, प्रगती गायकवाड, कोमल सोळंके आणि लक्ष्मी सातव यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांकडून ही आसने करून घेतली. प्रा. डॉ. सांगळे यांनी प्रत्येक आसनाचे महत्त्व आणि फायदे समजावून सांगत नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्याला होणाऱ्या लाभांची माहिती दिली.यावेळी विविध योगगीते आणि प्राणायामाचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी जीवनशैलीची सवय लावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या योग उद्बोधन वर्गाला शाळेच्या मुख्याध्यापिका दवे मॅडम, शाळा समितीचे अध्यक्ष उमेश डोंगरदिवे, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post