जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात अकोला पोलीस दलातर्फे एक महिना सायबर जनजागृती मोहीम; नागरिकांनी १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन...


 जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात अकोला पोलीस दलातर्फे एक महिना सायबर जनजागृती मोहीम; नागरिकांनी १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन...

सैयद शकील/अकोट तालुका प्रतिनिधी...

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र सायबर यांच्या सूचनेनुसार अकोला पोलीस दलामार्फत संपूर्ण जिल्हाभर एक महिना सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांनी दिली.सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. विशेषतः यूपीएस (UPS) द्वारे होणारी फसवणूक, केवायसी (KYC) च्या नावाखाली होणारी फसवणूक आणि बनावट कस्टमर केअरच्या माध्यमातून होणारी फसवणूक या अनुषंगाने या मोहिमेत प्रामुख्याने जनजागृती करण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून कसे वाचावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, आपले बँक खात्याचे तपशील, ओटीपी कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जर आपली अशा प्रकारे कोणतीही फसवणूक होत असेल तर तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करावा किंवा जवळच्या अकोट शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन ठाणेदार किशोर जुनघरे यांनी केले आहे.

Previous Post Next Post