शिवसेनेच्या वैष्णोदेवी - कटरा नवरात्र छडी यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव सहभागी...


 शिवसेनेच्या वैष्णोदेवी - कटरा नवरात्र छडी यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव सहभागी...

बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...

शिवसेनेच्या वैष्णोदेवी कटरा नवरात्र छडी यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सहभाग नोदविंत घटस्थापनेच्या मुहूर्तावर वैष्णोदेवीच्या पहिल्या माळेची विधिवत पुजा संपत्नीक करून देशवासीयांना  निरोगी आरोग्य दे .. त्याचे जीवन सुखी, समृद्ध आणि संकटमुक्त होऊ दे, आणि बळीराजाला दुष्काळी परिस्थितीतून सावरण्याची शक्ती दे ..अशी प्रार्थना  आज वैष्णोदेवीच्या चरणी केली.शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून १९८३ मध्ये सुरू झालेली माँ वैष्णोदेवीची पवित्र ‘छडी यात्रा’ गेल्या ४४ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक सलोख्याची परंपरा जपणाऱ्या या यात्रेला यंदाही भक्तिभावाने सुरुवात झाली.शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  यावर्षीच्या शिवसेनेच्या वैष्णोदेवी छडी यात्रेत केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले होते .जम्मू येथील ऐतिहासिक श्री रघुनाथ मंदिरातून  छडी आणि अखंड ज्योत घेऊन निघालेली ही यात्रा कटरा मार्गे माँ वैष्णोदेवीच्या मुख्य भवनापर्यंत आज सकाळी पोहचली. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर वैष्णोदेवीच्या पहिल्या माळेनिमित्य केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राजश्री जाधव यांनी सपत्नीक वैष्णव देवीची विधीवत पुजा करून महाआरती केली आणि पवित्र छडीचे पूजन केले.देशात सुख, शांती, समृद्धी आणि बंधुभाव कायम राहावा, देशवासीयांना  निरोगी आरोग्य दे .. त्याचे जीवन सुखी, समृद्ध आणि संकटमुक्त होऊ दे, आणि बळीराजाला दुष्काळी परिस्थितीतून सावरण्याची शक्ती दे ..अशी प्रार्थना  आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वैष्णोदेवीच्या चरणी केली.

Previous Post Next Post