नवदुर्गा उत्सव उत्साहात संपन्न.सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्समध्ये नवदुर्गोत्सव उत्साहात साजरा;


 नवदुर्गा उत्सव उत्साहात संपन्न.सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्समध्ये नवदुर्गोत्सव उत्साहात साजरा.

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्स, जळगाव जामोद येथे नवदुर्गोत्सवानिमित्त शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी नवदुर्गेच्या नऊ रूपांप्रमाणे आकर्षक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जणू काही नवदुर्गेचे दिव्य स्वरूप सातपुड्याच्या शैक्षणिक परिसरात अवतरल्याचा भावपूर्ण अनुभव उपस्थितांना आला.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सीईओ नितीन सातव व संस्थेच्या संचालिका गौरीताई सातव यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आली. यावेळी प्राचार्य रजतकुमार नायक सर, प्राचार्य संतोष बकाल, सुपरवायजर मंगला जाधव तसेच संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या उत्सवात चिमुकल्या विद्यार्थिनींनी सुंदर वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली. पारंपरिक दांडिया नृत्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. भक्ती, संस्कृती आणि आनंद यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.भारतीय संस्कृतीतील परंपरा, धार्मिक मूल्ये आणि सण-उत्सवांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या नवदुर्गोत्सवामुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले.सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्समध्ये आयोजित हा नवदुर्गोत्सव चिमुकल्यांच्या निरागस सहभागामुळे आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे संस्मरणीय ठरला.

Previous Post Next Post