‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’चा संदेश; माँ भवानी मंडळाचा स्तुत्य उपक्रम;मोफत रोगनिदान व औषध वाटप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
जळगाव जामोद(प्रतिनिधी);रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’चा संदेश; माँ भवानी मंडळाचा स्तुत्य उपक्रम;मोफत रोगनिदान व औषध वाटप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
संत तुकाराम महाराजांच्या “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा” या अभंगातून प्रेरणा घेत माँ भवानी नवरात्र उत्सव मंडळ, बालाजी गल्ली, जळगाव जामोद यांच्या वतीने शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी मोफत रोगनिदान व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आरोग्य तपासणी व मोफत औषधांचा लाभ घेतला.शिबिरात डॉ. शिवानी पाटील, डॉ. अभिजित देशमुख, डॉ. अतुल गट्टानी, डॉ. मंगेश बडेरे, डॉ. संदीप राखोंदे व डॉ. अतुल अंबडकर यांनी वैद्यकीय सेवा दिली. औषध वाटपासाठी श्री सत्य साई संघटनेने सहकार्य केले.कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत अजाबराव देशमुख, प्रवीण चौधरी व सौ. सुजाता बंबटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अभिजित देशमुख यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.समाजसेवेचा आदर्श जपत आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल मंडळाने डॉक्टर टीम, औषध वाटप टीम तसेच शिबिराला सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले.
