रसुलपुरात रक्तरंजित राडा! नमाजाहून परतणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी पाईप; भांडण सोडवणाऱ्या पत्नीलाही मारहाण, सहा जणांवर गुन्हा!


 रसुलपुरात रक्तरंजित राडा! नमाजाहून परतणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी पाईप; भांडण सोडवणाऱ्या पत्नीलाही मारहाण, सहा जणांवर गुन्हा!

जळगाव जामोद (प्रतिनिधी);

तालुक्यातील रसुलपूर येथे नमाज पठण करून घरी परतणाऱ्या व्यक्तीवर सहा जणांनी हल्ला केल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी फिरोजा हमीद तडवी (वय ४५, रा. रसुलपूर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पती मशिदीतून नमाज पठण करून घरी जात असताना आरोपी रहीम दरबार तडवी याने त्यांच्या डोक्यात लोखंडी शॉकअप पाईप मारल्याने ते जखमी होऊन खाली पडले. त्यानंतर ईस्माईल दरबार तडवी याने विटेने मारहाण केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादींच्या अंगावर इरफान दरबार तडवी हा विळा घेऊन धावून आल्याचे, तर सिताब दरबार तडवी याने फिर्यादींच्या पतीच्या डोक्यात काठी मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच नाशीर मन्वर तडवी हा वीट घेऊन अंगावर धावून आला, तर समशेर दरबार तडवी याने फिर्यादी व त्यांच्या पतीला चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी रहीम दरबार तडवी, ईस्माईल दरबार तडवी, इरफान दरबार तडवी, सिताब दरबार तडवी, नाशीर मन्वर तडवी आणि समशेर दरबार तडवी या सहा जणांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कायमी अप. क्र. ६३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Previous Post Next Post