जेवण करून झोपली अन् रात्री अचानक घरातून निघून गेली! १८ वर्षीय प्राची बेपत्ता; जळगाव जामोद पोलिसांत गुन्हा दाखल...


 जेवण करून झोपली अन् रात्री अचानक घरातून निघून गेली! १८ वर्षीय प्राची बेपत्ता; जळगाव जामोद पोलिसांत गुन्हा दाखल...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बु. येथून १८ वर्षीय प्राची दशरथ सुरळकार ही तरुणी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, प्राची ही ६ ऑक्टोबरच्या रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून झोपली होती. मात्र, रात्री ती घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी नातेवाईकांसह इतर ठिकाणी शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेले असावे, अशी शक्यता वडिलांनी तक्रारीत व्यक्त केली आहे.या प्रकरणी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रविकांत बावस्कर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. बेपत्ता तरुणीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Previous Post Next Post