सखाराम गड येथे १५ नोव्हेंबरला मराठा पाटिल समाजाचा वधू-वर परिचय मेळावा... मिळाव्याच्या यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी घेतली विविध जबाबदारी...


 सखाराम गड येथे १५ नोव्हेंबरला मराठा पाटिल समाजाचा वधू-वर परिचय मेळावा... मिळाव्याच्या यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी घेतली विविध जबाबदारी...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

मराठा पाटील समाजाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा वधू-वर परिचय मेळावा यावर्षीही श्रीक्षेत्र संत सखाराम महाराज संस्थान, सखाराम गड येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत दिनांक २ ऑक्टोबर रोजी समाजातील मान्यवरांची समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत यावर्षीचा मेळावा रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी, दिवाळीनंतरच्या पहिल्या रविवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले.वधू-वर परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी समाजातील दानशुर  मान्यवरांनी  दुष्काळी परस्थिती चा विचार करुन पुढील जबाबदाऱ्या स्वतहुन  स्वीकारून मोलाचे सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे.

जेवणाची संपूर्ण व्यवस्था व खर्च : आदरणीय बलदेवरावजी चोपडे, सामाजिक नेते, नांदुरा यांनी मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या सर्व समाजबांधव व वधू-वर परिचयासाठी येणाऱ्या उपस्थितांच्या जेवणाची संपूर्ण व्यवस्था व लागणारा खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली.

मंडप व बिछाईत : सामाजिक नेतृत्व सौ .जयश्रीताई सुनील शेळके यांनी मंडप व बिछाईतीचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली.

समाजासाठी देणगी : महेन्द्र रोठे सर यांनी स्व. बी. एस. रोठे यांच्या नावाने समाजासाठी ₹१०,००० देण्याचे जाहीर केले.

 पिण्याच्या पाण्याची व्यवस्था : नानासाहेब पाटील यांनी मेळाव्यासाठी पिण्याच्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वीकारली.

निमंत्रण पत्रिकेचा खर्च : सैनिक परमेश्वर थुटे पाटील यांनी वधू-वर परिचय मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली.

प्रसिद्धी फलक व बॅनर : गुलाबराव भाऊ मारोडे — ₹१५,००० आणि श्रीकांत दादा मारोडे — ₹१५,०००, असा एकूण ₹३०,००० खर्च उपलब्ध करून देण्याचे त्यांनी कबूल केले.

 सकाळचा चहा-नाश्ता : श्री.दाभाडे सर शेगाव यांनी सकाळच्या चहा-नाश्त्याची संपूर्ण व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वीकारली.

 मनुष्यबळ व स्थानिक व्यवस्था : चावरा-ईलोरा येथील स्थानिक समाजबांधवांच्या मनुष्यबळाची जबाबदारी गजानन भाऊ मोरखडे योगेश भिसे , डिगांबर पाटिल यांनी स्वीकारली.या सर्व मान्यवरांनी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यासाठी पुढाकार घेऊन दिलेल्या योगदानाबद्दल समाज व समितीच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले.मराठा पाटिल समाजातील सर्व समाजबांधवांनी या वधू-वर परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, तसेच विवाह इच्छुक युवक-युवतींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अॕड.भाऊराव भालेराव यांनी   केले. 


“समाजाच्या एकजुटीतून सामाजिक प्रगती आणि युवक-युवतींसाठी योग्य जीवनसाथीची निवड” या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्याबाबत समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.याप्रसंगी गुलाबराव  मारोडे जेष्ठ मार्गदर्शक , कार्याध्यक्ष कैलास कडाळे ,उपाध्यक्ष नानासाहेब पाटील ,कोषाध्यक्ष प्रमोद अढाव ,संघटक भाऊराव  अवचार, सरचिटणीस विश्वासराव वरणकार, मार्गदर्शक समितीचे अरुण  पाटिल ,गजानन  घिवे, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष रवी पाचपोर ,शेगांव तालुकाध्यक्ष वैभव दाभाडे, श्रीधर पाटिल ,अजय पारस्कार रामचंद्र वाघ ,रमेश  पाटिल ,मनोज वाघ, परमेश्वर थुटे पाटिल सैनिक, विकास पाटिल ,वैभव गांवडे, गजानन मोरखडे ,प्रकाश घोंगटे, प्रमोद पाटील तिवडीतुकाराम पाटिल गटमणे,वैभव सारोकार ,शिवाजी क्षीरसागर, प्रतिक उमाळे, योगेश भिसे, डिंगाबर तिजारे ,रामदास मोरखडे ,अरुण घिवे, अनुप घिवे ,बाळु पाटिल ,रामेश्व़र पाटिल, निलेश पाटील हुरसाळ व  समाजातील ईतर  मान्यवर  मोठ्या संखेने  उपस्थित होते.

Previous Post Next Post