जळगाव जामोद (प्रतिनिधी) :
जळगाव जामोद शहरातील संत रुपलाल नगर, वायलीवेस परिसरात एका २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अमोल लक्ष्मण ढगे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मागील सात दिवसांपासून दुर्गादेवी मंडळाजवळ दांडिया खेळण्यासाठी ये-जा करत असताना तिचा कथितरीत्या वाईट उद्देशाने पाठलाग करीत होता. भीतीपोटी तिने याबाबत कोणालाही सांगितले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.२३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता महिला दुर्गादेवीच्या आरतीसाठी घरातून बाहेर पडली असता आरोपी घराबाहेर उभा होता. त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने महिला त्याच्याशी न बोलता आरतीसाठी निघाली. त्यावेळी आरोपीने तिचा उजवा हात पकडल्याचा आरोप आहे. महिलेने हात झटकून आरडाओरड केली; मात्र मंडळाजवळ सुरू असलेल्या डीजेमुळे तिचा आवाज इतरांपर्यंत पोहोचला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.घटनेनंतर आरोपीने कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पळ काढल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. या तक्रारीवरून २४ ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर करीत आहेत.
