जळगाव जामोद(प्रतिनिधी);
आरोग्यदायी समाज निर्मितीचा संदेश देत डॉ. सतीश प्रल्हाद शिरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक ७ वाजता जळगाव जामोद येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धावूया आरोग्यासाठी... घडवूया निरोगी समाज!’ हा संदेश घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत नागरिक व युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.स्पर्धेची सुरुवात दुर्गा चौक, जळगाव जामोद येथून होणार आहे. महिलांसाठी ३ किलोमीटर, तर पुरुषांसाठी ५ किलोमीटर अंतराची स्वतंत्र स्पर्धा ठेवण्यात आली आहे. महिला गटाचा मार्ग दुर्गा चौक ते तकाराम चौक (पेट्रोल पंपाजवळ), तर पुरुष गटाचा मार्ग दुर्गा चौक ते आयटीआय कॉलेज (जळगाव जामोद–नांदुरा रोड) असा राहणार असल्याचे बॅनरमध्ये नमूद करण्यात आले आहे.स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम बक्षीस ₹७,७७७, द्वितीय ₹४,४४४, तृतीय ₹३,३३३, चौथे ₹२,२२२ आणि पाचवे ₹१,१११ असे बक्षिसांचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना धावपूर्तीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात नियमित व्यायाम व शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘निरोगी शरीर – सकारात्मक मन – सक्षम समाज’ या संकल्पनेतून होणारी ही मॅरेथॉन जळगाव जामोद परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.या स्पर्धेसाठी पंजाब म्हसाळ (Open Athletic) हे संपर्क प्रमुख असून अधिक माहितीसाठी 8483900538 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. डॉ. सतीश प्रल्हाद शिरेकर मित्र परिवाराच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्यासाठी धावण्याचा संकल्प करा; मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
आरोग्य, व्यायाम आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात जळगाव जामोद शहरासह परिसरातील युवक-युवती व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मॅरेथॉन यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
