बुलढाणा शहरात राजे संभाजीनगर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात संपन्न..!


 बुलढाणा शहरात राजे संभाजीनगर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात संपन्न..!

बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...

नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त बुलढाणा शहरातील राजे संभाजीनगर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित महाआरती सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माझ्या आणि बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई संजय गायकवाड यांच्या हस्ते राजे संभाजीनगर मित्र मंडळात आई जगदंबेची सपत्नीक महाआरती भक्तिभावाने संपन्न झाली.यावेळी आई जगदंबेची मनोभावे पूजा व महाआरती करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. भाविक भक्त, नागरिक, माता-भगिनी आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या कार्यक्रमाप्रसंगी बुलढाणा नगरपालिकेचे उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, सभापती नयनप्रकाश शर्मा, नगरसेवक बबलू मावतवाल, योगेश परसे, प्यारेलाल हडाळे, नगरसेविका सविताताई हडाळे, नगरसेविका देवांगनाताई ठाकरे, अमित ठाकरे, कमलेश कोठारी, रंजीत गायकवाड, नामदेव म्हस्के, सोमु कायस्थ, निखिल शर्मा, रवी भगत, महेश भंडारी, बोदेकर साहेब, अजय खोत, पिंटू काटकर, अशोक दांदडे, अज्जू हडाळे, राहुल आवरकर, सुमित तेलंग, शुभम साबळे, योगेश मोरे ठाकरे, शुभम पुरी, अक्षय पुरी, यश मेतकर, प्रेम मेतकर, संकेत पोपळकर, अमेय खंडागळे, राजेश गिरी, शुभम पोपळकर, सुमित देशमुख, कृष्णा इंगळे, सुजित जोशी, तेजस उज्जैनकर, तुषार गाडेकर, रोहित सूर्यवंशी, अभिषेक घुले, तन्मय नाफडे, श्री पैठणकर, श्री म्हस्के, दीपक खर्चे, रामेश्वर गायकवाड, निशांत गवादे, मनोज पवार, अंकित मिसाळ, आदर्श गवई, अभिजीत चव्हाण, सुनील नरोटे, सत्य विजय निषाद आणि स्वप्निल मोहरील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मंडळांचे सदस्य आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

Previous Post Next Post