मतदार संघातील वंचित राहीलेली ३९ गांवे जिगांव व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प व विविध प्रकल्पाला लवकरच जोडल्या जाणार– ना ॲड आकाश फुंडकर.


मतदार संघातील वंचित राहीलेली ३९ गांवे जिगांव व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प व विविध प्रकल्पाला लवकरच जोडल्या जाणार– ना ॲड आकाश फुंडकर.

सुरज देशमुख/बुलढाणा...

जिगाव प्रकल्प व वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामध्ये वगळण्यात आलेल्या खामगाव तालुक्यातील २१ गावांचा तातडीने समावेश करून सिंचनाच्या पाण्याचा लाभ द्यावा, अशी सामूहिक मागणी भारतीय जनता पार्टी खामगाव ग्रामीण मंडल-२ चे तालुका अध्यक्ष श्यामसुंदर सारंगधर पाटेखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री ना. ॲड आकाशदादा फुंडकर यांना देखील निवेदन देण्यात आले.विदर्भ मराठवाडासाठी नव संजीवनी समजल्या जाणाऱ्या जिगाव व नदीजोड प्रकल्प हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या प्रकल्पामुळे शेतीला संजीवनी मिळणार आहे. मात्र नियोजनात काही गावे वगळण्यात आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पातून वगळण्यात आलेली गावे : किन्ही महादेव, नायंदेवी, खेर्डी, लोखंडा, पाळा, झोडगा, वझर, घारोड, निरोड, नागापूर, अकोली, अटाळी, गवंडाळा, गणेशपूर, नागझरी खुर्द, नागझरी बु., उमरा अटाळी, चिंचपूर, पिंपरी कोरडे, निमखेडी, फत्तेपूर, शिराळा इत्यादी गावे आहेत. या गावांतील बहुतांश शेतकरी शेतीवर अवलंबून असून पावसाच्या अनिश्चिततेमुळे दरवर्षी मोठे नुकसान सोसावे लागत आहे. सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने शेतीचे उत्पादन घटत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनाही प्रकल्पाचा लाभ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सदर निवेदनातील प्रमुख मागण्या १. वगळलेल्या सर्व गावांचा प्रकल्पात तातडीने समावेश करावा. २. गावांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून तांत्रिक व प्रशासकीय नियोजन करावे. ३. सुधारित आराखड्यात (DPR) या गावांचा समावेश करावा. ४. शेतकरी व ग्रामपंचायत प्रतिनिधींची संयुक्त बैठक घ्यावी. ५. सर्व गावांना न्याय मिळेल असे पाणी वाटप व सिंचन नियोजन करावे.“ही केवळ काही गावांची मागणी नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. एखादेही गाव विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये, हीच आमची अपेक्षा आहे,” असे पाटेखेडे यांनी सांगितले.भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष श्याम पाटेखेड व नरेंद्र शिंगोटे यांच्या नेतृत्वात मतदार संघातील २२ गांवे जी जिगांव व वैनगंगा- नळगंगा नदी जोड प्रकल्पा पासून वंचित राहीलेली आहेत. त्या गावांचा समावेश या सिंचन प्रकल्पांतर्गत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. याची प्रत ना ॲड आकाशदादा फुंडकर यांना देण्यात आली.यावेळी उपविभागीय अभियंता चावरे साहेब यांनी शेतकरी बांधवांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला. जिगाव प्रकल्पातून २२ गावे वगळण्यात आल्याच्या अफवांमुळे निर्माण झालेल्या गैरसमजुतींबाबत त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. मंत्री आकाशदादा फुंडकर यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत खामगाव तालुक्यातील एकही गाव सिंचनाच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्याचेही यावेळी चर्चेत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.श्याम पाटेखेडे यांच्या संपर्क व समन्वयातून शेतकरी बांधवांनी एकत्र येत आपली मागणी प्रशासनासमोर मांडली. आता संबंधित प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून सर्व २२ गावांच्या समावेशासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली. या निवेदनाच्या प्रती कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन व कार्यकारी अभियंता, जिगाव प्रकल्प, बुलढाणा यांना देण्यात आल्या आहेत.

यावर ना. फुंडकर यांनी केवळ २२ गावेच नाही तर मतदार संघातील एकुण ३९ गावांचा समावेश जिगांव, वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पासह विविध प्रकल्पांमध्ये करण्यात येणार असून त्यातून सर्व गावे सिंचनाखालील येणार आहेत. मतदार संघातील कोणतेही गांव शाश्वत सिंचनापासून वंचित राहणार नाही. असे ही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलतांना ना. फुंडकर म्हणाले की, मतदार संघातील उपरोक्त गावांसह अटाळी, झोडगा, नागझरी बु., घारोड, किन्ही महादेव, गणेशपूर, पाळा, उमरा अटाळी, वझर, नायदेवी, नागापूर, खेर्डी, गवंढाळा, निरोड, लोखंडा, अकोली, नागझरी खु, तरोडा नाथ, भंडारी, उमरा, इवरा, हिवरा खु, पिंपळचोच, भेंडी, कवडगांव, चिंचखेड, बेलखेड, शेंद्री, गेरु, वाकी, गोराडी, गारपेठ, थार, श्रीधर नगर, कोन्टी, पिंप्री कोरडे,चिंचपूर, फत्तेपूर, व शिराळा अशी एकुण ३९ गावे आहेत ही गांवे सध्या मोठया सिंचन प्रकल्पापासून वंचित आहेत. या सर्व गावांचा समावेश जिगांव, वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पासह विविध सिंचन प्रकल्पात जोडल्या जाणार आहे. ज्यामुळे निरंतर सिंचन व्यवस्था कायम स्वरुपी या गावांना लाभणार आहे. पुर्वी मतदार संघात केवळ पावसावर आधारीत शेती होत असल्यामुळे शेतकरी केवळ हंगामी पिक घेऊ शकत होता परंतु माझ्या १० वर्षाच्या कारर्किदीत मतदार संघात सिंचनासाठी विविध उपाययोजना केल्यामुळे बहुतांश भाग सिंचनाखाली आलेला आहे. आज शेतकरी खरीपासह रब्बी हंगामात देखील पिक घेत आहे. या सोबतच अनेक भागात केळी संत्राची शेती केल्या जात आहे.

Previous Post Next Post