जळगाव जामोद(प्रतिनिधी);
हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद येथील तहसील चौकात शिवसेना जळगाव जामोदच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षनेत्या सौ. डॉ. स्वाती वाकेकर, शिवसेना बुलढाणा जिल्हाप्रमुख गजाननराव वाघ, काँग्रेस पंचायत राज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अविनाश उमरकर, डॉ. संदीप वाकेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम भाऊ काळपांडे, उपसभापती शांताराम धोटे, शिवसेना विधानसभा संघटक भीमराव पाटील, शिवसेना शहरप्रमुख रमेश ताडे, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अमर पाचपोर, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अर्जुन घोलप, ॲड. संदीप मानकर, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख कैलास राजपूत, योगेश ढोकणे, युवासेनेचे संकेत राहाटे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल पाटील, युवराज देशमुख, संतोष धगे, कैलास मिसाळ, राजाराम भिवटे तसेच पिंटू सातोडे (असलगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारांना अभिवादन केले. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान तसेच मराठी माणसाच्या हक्कासाठी केलेला संघर्ष यांचे स्मरण करण्यात आले.कार्यक्रमाला शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.
