गौलखेडा बाजार येथे आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते vbg Ramg कामाचे उद्घाटन संपन्न..
राजु भास्करे/अमरावती...
मेळघाट हा अतिशय दुर्गम भाग असून या मेळघाटातिल मजुर वर्ग व मुले बाळ घेवून दुसऱ्या शहरात कामावर निघतात त्या मुळे शाळेकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होते.याच कारणामुळे महाराष्ट्र सरकारने मजुर वर्ग स्थलांतर होवू नये म्हणून मेळघाटात पुष्कळ वर्षांपासून मनरेगा चे कामे सुरू केले.त्याच प्रकारे चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार या गावात मेळघाट क्षेत्राचे आमदार केवलराम काळे यांच्या प्रयत्नाने गौलखेडा बाजार वासियांना vbg Ramg मधून कामे उपलब्ध करुन दिले असून या कामाचे उद्घाटन पार पडले आहे.या vbg Ramg कामाच्या उद्घाटनप्रसंगी कु.अनुराधा बेलसरे सरपंच,रमेश महल्ले पो.पाटील, सुधीर भागवत सचिव,हरसुले तांत्रिक,के.जे .जामकर, आकाश जयस्वाल, संजय भास्कर, दादाराव दारसिंबे,हिरामण बेलसरे व रोजगार सेवक मजुंशा मावस्कर हे होते.
