जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा ते चांगेफळ या रोडवरील सौदागर यांच्या शेताजवळील पुलाच्या कठड्यावर मोटारसायकल धडकुन झालेल्या भिषण अपघातात एक इसम जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान घडली आहे.सदर इसम हा जळगांव जामोदहुन संग्रामपुर कडे जात होता.सदर इसमाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे.सदर इसम हा MH28 N5146 क्रमांकाच्या हिरो होंडा कपनीच्या मोटरसायकलने जात होता. सदर घटनेची माहिती मिळताच जळगांव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथील वाहन चालक राजु बुटे व त्यांच्या टिमने घटनास्थळी अँब्युलन्सने धाव घेत सदर इसमाला ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सदर इसमाची अद्यापर्यंत ओळख पटलेली नाही. सदर व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव जामोद पोलीस स्टेशन च्या वतीने करण्यात आले आहे घटनास्थळी जाऊन जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सदर मृत इसमाच्या अंगामध्ये निळ्या कलरचे शर्ट, जांभळ्या कलरचे बनियन, हातामध्ये कडे ,कानामध्ये बाली, तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची आयडी अथवा कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा नव्हता. सदर इसमाची ओळख पटली असुन सदर इसमाचे नाव राजेश बळिराम डाखोटे.रा.काथरगांव ता.संग्रामपुर येथील रहिवासी आहे.
पुलाच्या कठड्यावर मोटारसायकल धडकुन झालेल्या भिषण अपघातात 35 वर्षीय इसम ठार...
जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.
