असाहि एक विवाह सोहळा जिथे नवरदेव मुलाने केला सर्वांच्या समोर आदर्श उभा...



 जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.

जळगाव जा.शहरातील गोपाल श्रावण वंडाळे या तरुण युवकाचा दिनांक 26 फेब्रुवारी रोजी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला ज्यामध्ये वराकडून 10 पाहुणे आणि वधू कडून 10 पाहुणे एवढ्या लोकांच्या प्रमुख उपस्थितीत हा  विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर फक्त चहा पाण्यावरच लग्नाचा समारोप करण्यात आला यावेळी जळगाव जामोद नगरपरिषदेची शिवसेना नगरसेवक तथा शिक्षण सभापती रमेश ताडे यांनी वधू वरास शुभ आशीर्वाद देत. शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी गोपाल वडाळे या तरुणा विषयी गौरोध्दगार काढत वंडाळे परिवार तसेच राउत परीवाराचा आदर्श सर्व बारी समाजाने घ्यावा तसेच या कोरोना महामारी च्या काळामध्ये असे विवाह प्रत्येक ठिकाणी पार पडावे जेणेकरून करोणा महामारी चा फैलाव होणार नाही. तसेच असे विवाह सोहळे पार पडल्याने या महागाईच्या काळामध्ये पैशाची व समाजाची फार मोठी हानी टळेल बारी समाजातील युवक मुलांनी गोपाल श्रावण वडाळे या तरुणाचि आदर्श घेऊन अशा पद्धतीने  विवाह सोहळे पार पाडावे असे आवाहन ही नगरसेवक रमेश ताडे यांनी केले.

Previous Post Next Post