जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रा प जामोद काही न काही विषयात चर्चेत राहत आहे , दि. ८ मार्च च्या देशोन्नती अंकात जामोद ग्राम पंचायत च्या १२ सदस्यांनी जि.प. कार्यकारी अधिकारीयांचे कडे घरकुल नियमकुल भ्रष्टाचारबाबत तक्रारीबाबत चे वृत्त प्रकाशित झाले होते, या मध्ये सरपंच, सचिव व गट विकास अधिकारी संगनमत करून खोटे कामे करीत आहे व विस्तार अधिकारी मोरे यांनी ठराव नसताना अतिक्रमणे नियमनुकूल केले अशी तक्रार दिलेली होती, यात आमच्या प्रतिनिधी ने पडताळणी केली असता ग्रा प जामोद च्या ग्रामसभा दि 6/9/18 च्या ठराव क्रमांक 8 नुसार 43 लाभार्थी ना मंजुरात दिली आहे व तेच लाभार्थी अतिक्रमण नियमनुकूल करून आज त्यांना घरकुल मिळून ते लोक आनंदात राहत असताना च राजकीय द्वेष भावनेतून खोटी तक्रार दाखवून ते 12 सदस्य दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले. सरपंच सौ दामधर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की , लोकोपयोगी ठरावला विरोध करून हे सदस्य विकासाचा बट्ट्याबोळ करत असल्याने या ग्रा प च्या सदस्यांवर जागरूक ग्रामस्थ भीमराव सुलताने, सलीम जी व राजेश ढगे यांनी कलम 39 नुसार अपत्रतेची मागणी केली आहे व त्याची सूनावणी कार्यकारी अधिकारी बुलडाणा कडे लागल्याने व ती पदे जाणारच या भीती मुळे चिडून ते पस प्रशासन व सरपंच वर खोटे आरोप करत असल्याचे सरपंच यांनी प्रतिनिधी शी बोलताना नमूद केले.मागासवर्गीय वस्ती साठी पहिल्यांदा कोटी ने रुपये सरपंच व त्यांचे सहकारी सदस्य अरुण पारवे, सविता दलाल, कल्पना गवई, नंदाताई सोळंके, चव्हाण यांचे प्रयत्नातून मंजूर झाले त्यात शाषणा कडून अभ्यासिका, रस्ते, दलित वस्ती मध्ये हायमास्ट लाईट, रस्ते, व्यायामशाला, तसेच 15 वित्त मधून लाखो ची कामे आहेत, परंतु यास विरोध दर्शवून गावाचा विकास ही मंडळी थांबवत असल्याने त्यांचे वर अपत्रतेची प्रकरणे दाखल झाल्याचे सरपंच यांनी सांगितले,
या 12 सदस्य यांनी दिलेल्या खोट्या तक्रारीवरन लाभार्थी मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, हे सर्व फक्त गरीब द्वेष व जातीय द्वेषतूनच होत असल्याची चर्चा गावात रंगत आहे.
🔹विस्तार अधिकारी संदिप मोरे यांनी दिलेली प्रतिक्रिया..🔹
जो ठराव नसताना अतिक्रमण नियमनुकल केले असा आरोप 12 ग्रा प सदस्य यांनी लेखी तक्रार द्वारे केला, वास्तविक 6/9/28 ठराव नं 8 नुसारं ग्रा प ने च प्रस्ताव दिल व त्यानुसार प्रकरणे मंजूर झाली, यात सम्बधितची तक्रार ही द्वेष भावनेतून आहे, सरपंच यांचे विरुद्ध अहवाल बनवावे असा अट्टाहास या 12 सदस्यांचा होता ,नियमानुसार वस्तुस्थिती चौकशी केल्याने यांनी चिडून जाऊन ही तक्रार केली आहे, आज ते अतिक्रमण धारक मंजूर घरे पूर्ण करून वास्तव्य करत आहे,खोट्या तक्रारी वरून नियमानुसार वरिष्ठांची परवानगी घेऊन नियमानुसार कारवाई करू
संदीप मोरे
विस्तार अधिकरी
प.स जळगाव जा.