बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुरज देशमुख
जलंब जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जलंब पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी पोलीस स्टेशन चा कारभार महीला कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. जलंब पोलीस स्टेशन चे ठाणेदार धीरज बांडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये महिला पोहेकॉ चंद्रलेखा शिंदे यांच्याकडे ठाणेदार पदाचा पदभार तर स्टेशन डायरी चा पदभार रुपाली थोरात यांच्याकडे तसेच वायरलेस चा पदभार अंजुम शेख या महिला कर्मचाऱ्यांकडे दिला. या तीनही महिला कर्मचाऱ्यांचा ठाणेदार धीरज बांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पीएसआय राहुल कातकाडे, पोका संदीप गावंडे, गोविंदा होनमाने,गोपाल सोनोने, अमोल कवळे उपस्थित होते.दिवसभर या महिला कर्मचाऱ्यांनि कामकाज सांभाळले. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.