शेेेगाव ता.प्रतिनिधी:-
शेगाव येथील स्थानिक दसरा नगर परिसरात आज 17 मार्च रोजी एका 19 वर्षीय युवकाने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली याबाबत शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दसरा नगर परिसरात राहणाऱ्या वैभव शंकर धोटे या 19 वर्षीय युवकाने स्वतःच्या राहत्या घरात तील पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली सदर घटना आज बुधवार 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान घडली या बाबत ची माहिती शेतातून परत आलेल्या वडिलांना वैभव च्या बहीणीने दिलेली घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला व प्रेत खाली उतरवून शवविच्छेदन करण्यासाठी सईबाई मोटे रुग्णालयात पाठवले आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही या घटनेने दसरा नगर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली अधिक तपास शेगाव पोलिस करीत आहेत
