शेगाव ता.प्रतिनिधी:-
शेगाव नगरपालिका तर्फे शहरातील व्यापारी व दुकानदारांसाठी कोरोना तपासणे शिबिर छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील टाऊन हॉल येथे घेण्यात येत आहे मात्र या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग चा पूर्णपणे फज्जा उडालेला दिसत आहे.. शेगाव शहरातील दुकानदारांना व त्या दुकानातील कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट रिपोर्ट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे टेस्ट रिपोर्ट सादर न करणाऱ्या दुकानदारांना पाच हजार रुपये दंड व दुकानाला सील ठोकण्याची कारवाई करण्याचा इशारा शेगाव नगरपालिकेने जाईल सूचने द्वारा दिलेला आहे त्यामुळे दुकानदारा मध्ये खळबळ निर्माण झालेली आहे प्रशासनाकडून शेगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या टाऊन हॉल येथे एकमेव तपासणी शिबिर लावण्यात आलेले आहे त्यामुळे या एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी व दुकानदारांनी गर्दी केल्याने सोशल डिस्टंसिंग चा पार फज्जा उडालेला दिसत आहे..
