25 क्विंटल सालई गोंद व सागवान जप्त.आर एफ ओ शुभांगी डेहणकर यांची धडाकेबाज कारवाई...


 अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करे.

संपूर्ण  देश महिला दिवस साजरा करीत असताना मेळघाट मधील वनविभागाची सुसरदा वनपरीक्षेत्राच्या रणरागिणी महिला वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहणकर यांनी आपल्या पथकासह सावलीखेडा येथे धडाकेबाज कारवाई करत   25क्विंटल सालाई चे गोंद सह सागवानी लाकूड जप्त केले आहे. एसिएफ  श्री.पवन झेप यांच्या मार्गदर्शणात आरे्फो शुभांगी देहणकर यांच्या टीमसह मोबाईल स्काड ने सावली खेडा गावामध्ये नाकाबंदी करून एका घराची झडती घेतली असता त्या घरामध्ये 25 क्विंटल सालाई चे गोंद व तीन सागवानी चौकट मिळालेल्या असून या टीम ने जप्त करून ही कार्यवाही केली,ही कार्यवाही परिसरातील सर्वात मोठी कार्यवाही समजली जात आहे. या कारवाही मध्ये एस के मुंडे, कल्याणकर वनरक्षक कविता नांगरे,अनिल अखंडे ड्रायवर मो.शफिक आदी सहभागी होते.वनसंपदेच्या सरक्षनार्थ शुभांगी डेहणकर यांच्या या कार्यवाहीची सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Previous Post Next Post