अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करे.
धारणी येथून जवळच असलेल्या चिचघाट येथे ट्रॅक्टर पलटी होऊन चिचघाट येथील आदिवासी युवक रोहित अशोक धांडे वय 18 याचा जागीच ठार झाला असून एक गंभीर जख्मी झाला आहे.आज सकाळी 9. वाजता ही घटना घडली आहे.चिचघाट येथून जवळ असलेले बेरदा भुरू जवळ राजस्थान येथील रमेश मेघवाल यांचा विना क्रमांकाचा सोनालिका ट्रॅक्टर रोटवेटर घेऊन प्रभू नंदलाल काकडे रा. बेरदाभुरू हा गोंडवाडी कडे जात असताना बेरदाभुरू तलावाच्या बाजूला ट्रक्टर पलटी झाला. रोहित अशोक धांडे हा ड्रॉयवर च्या बाजूला ट्रॅक्टर वर बसला होता.ड्रायव्हर चे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला.त्यामध्ये रोहित अशोक धांडे वय 18 यांचा जागीच मृत्यू झाला.पोलीस पाटील चिचघाट यांनी धारणी पो. स्टे. ला माहिती दिली आहे. पुढील तपास धारणी पोलीस करीत आहे.