शेतकऱ्यांवर कुठल्याही परिस्थितीत आम्ही हे अन्याय होऊ देणार नाही शेतकऱ्यांना खात्रीने पिकवीमा मंजूर करण्यात येईल असे आश्वासन कृषि मंत्री दादाजी भूसे यांनी एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांना सागिंतले.येत्या एक ते दीड महिन्यात टप्या-टप्याने पिकवीमा मंजूर होईल असे यावेळी कृषी मंत्री दादा भूसे यांनी सांगितले. जळगांव जा. व संग्रामपुर या दोन तालुक्यातील शेतकऱ्याना पिक विमा मिळणे बाबत याकरिता दि.९ मार्च २०२१ रोजी एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा.दादाजी भूसे यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेत निवेदन दिले.गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आंदोलन तसेच पाठपुरवठा करुन सुद्धा प्रशासन व पिकवीमा कंपनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासंदर्भात कुठलीच कार्यवाही करतांना दिसत नाही याच संदर्भात प्रसेनजीत पाटिल यांनी दादाजी भूसे यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेत जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यातील पिकवीमा तात्काळ मंजूर करण्यात यावा यासाठी निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली. पिकवीमा कंपनी महसूल विभाग,कृषि विभाग व विमा कंपनी यांनी काढलेला सयुक्त पिककापनी अहवाल व आनेवारी झुगारण्याच्या मनस्थितीत आहे काही खासगी पिकवीमा कंपनी शेतकऱ्यांना फसवन्याच काम करत आहेत त्यांना वठनीवर आनण्याच काम आम्ही करू तसेच कुठल्याही परिस्थितीत आम्ही हे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही शेतकऱ्यांना खात्रीने पिकवीमा मंजूर करण्यात येईल असे आश्वासन कृषिमंत्री दादाजी भूसे यांनी एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांना दिले.येत्या १ ते १.५ महिण्यात टप्याटप्याने पिकवीमा मंजूर होईल असे यावेळी दादा भूसे यांनी सांगितले. यावेळी सिंदखेड़राजाचे माजी आ. शशिकांतदादा खेडेकर हे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना पिकवीमा मिळवून देऊ - कृषि मंत्री दादाजी भूसे यांचे आश्वासन..
जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.