मलकापूर येथे सात वर्षीय मुलीचे 35 वर्षिय इसमाने केले अपहरण...


 मलकापुर ता.प्रतिनिधी:-

मलकापूर येथे सात वर्षीय मुलीचे 35 वर्षीय इसमाने अपहरण केल्याची फिर्याद तिच्या वडीलांनी मलकापूर ग्रामिण पोलीसांत नोंदविली असून पोलीस मुलीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुलीची शोधपत्रीका जाहीर केली आहे.यासंदर्भात भुरा खाय - या मानकर वय 39 वर्ष धंदा मजुरी रा . मेथा खेडी ता . झरनिया जि.खरगोन ( मध्य प्रदेश ) ह.मु. वडजी ता . मलकापुर यांनी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की , दि 24 फेब्रु चे 09 वा दरम्यान फिर्यादी घरी असतांना फिर्यादीचा चुलत भाउ राजु कालु मानकर हा फिर्यादीला भेटण्यासाठी वडजी येथे फिर्यादीचे घरी आला व जातांना फिर्यादीची मुलगी नामे दुरमा भुरा मानकर वय अंदाजे 7 वर्ष हिस त्याचे आई वडीलाचे घरी हरणखेड येथे नेतो असे सांगुन मुलीला कोठे तरी पळवुन नेले आहे . मुलीचा आज पावेतो शोध घेतला परतु मुलगी मिळुन आली नाही . आरोपी राजु कालु मानकर वय 35 वर्ष रा रा . मेथा खेडी ता . झरनिया जि.खरगोन ( मध्य प्रदेश ) ह.मु. हरणखेड ता . बोदवड जी जळगाव असून त्याचा रंग काळा सावळा बांधा सडपातळ , उंची अंदाजे 5 फुट 5 इंच अंगात काळया रंगाची पँट व पांढरा शर्ट केस मोठे पायात चप्पल आहे.तसेच मुलगी कु . दुरमा भुरा मानकर वय अंदाजे 7 वर्ष हिचे वर्णन रंग - सावळा , केस – काळे लहान , उंची - अं .3 फुट , अंगात- फीकट गुलाबी रंगाचा टॉप काळया रंगाची , लेगी , कानात - बाजारातील रींग असे वर्णन आहे.अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन 39/2021 क 363 भादवी नुसार दाखल करुन तपास पोउपनि नामदेव तायडे यांच्या कडे देण्यात आला.आहे तरी नमुद आरोपी व अपहर्त मुलगी मिळुन आल्यास पोलीस स्टेशन मलकापुर ग्रामीण फोनं 07267 -222258 व तपास अधीकारी पोउपनि नामदेव तायडे पोस्टे मलकापुर ग्रामीण मोन 9921289172 शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Previous Post Next Post