आई जिजाऊ युवती दल व नारी शक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी.अतिशय खडतर जीवन जगत असताना सुद्धा महिलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून विरोधाचा सामना करीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले त्या मुळेच आज महिलांना सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची संधी प्राप्त झाली आहे असे प्रतिपादन येथील मुरारका हायस्कूलच्या शिक्षिका हाडोळे मॅडम यांनी केले स्थानिक धानुका कंपाऊंड जवळ कोरोना नियमाचे कडेकोट पालन करीत आई जिजाऊ युवती दल नारी शक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले स्मृतिदिन निमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी प्रमुख म्हणून उपस्थित असलेल्या शिक्षक संजय कळमकर सर यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले या खरोखरच आदर्श शिक्षिका होत्या त्यांनी अनेक हाल अपेष्टा सहन करुन न डगमगता महिलांना शिक्षणाची दारे उघडी करण्यासाठी जो संघर्ष केला आहे त्याचीच परिणती म्हणून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला उच्च जिजाऊ शिक्षण घेऊन सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत पोहोचत आहेत सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्वांनी त्यांना आदरांजली वाहिली कार्यक्रमाला उपस्थित प्रेस क्लब शेगाव चे कार्यकारणी सदस्य राजकुमार व्यास आई जिजाऊ युवती दल अध्यक्ष कुमारी आयुषी दुबे नारी शक्ती संघटनेच्या सचिव सौ प्रिया जोशी सहसचिव सीमा दुबे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आकर्षण कुमारी आर्या संजय कळमकर येणे अतिशय उत्कृष्ट अशी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करून सावित्रीबाईंचे पात्र जिवंत केले यावेळी सौ रुपाली गोपाल भटकर मीनाक्षी कळमकर सौ प्रमिला कळकार सौ सुरेखा हाडोळे कुमारी आयुषी दुबे कुमारी पल्लवी पंचवटकर कुमारी पूजा कैतवास कुमारी टीना कैतवास कुमारी हेमल परियाल कुमारी श्रावणी कळमकर आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिलांना प्रगती करण्याची संधी- सौ .हाडोळे मॅडम
शेेगांव ता.प्रतिनिधी.:-