दिनांक 10 मार्च 2021 रोज बुधवार ला आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून डॉक्टर शेषरावजी भोपळे दंतशल्य चिकित्सक यांच्याकडून देणगी रुपात शाळेत भव्य प्रवेशद्वार भूमिपूजन समारंभ डॉक्टर शेषरावजी भोपळे यांच्या हस्ते तसेच गावातील शिक्षणप्रेमी व याअगोदर शाळेला विविध भरभरून व भरगच्च अशा देणगी रुपात विविध विकास कामाच्या रूपाने शाळेस मदत दिलेले दानशुर नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडला.सर्वप्रथम आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रवींद्र भाऊ चोखट यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विविध मान्यवरांनी पूजन केले त्यानंतर सर्व दानशूर शिक्षणप्रेमी गावातील नागरिकांचा सत्कार समारंभ जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा खेर्डा बुद्रुक शिक्षक वृंदातर्फे करण्यात आला.आजच्या स्मृतिदिन व शाळा भव्य प्रवेशद्वार भूमिपूजन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश व्यवहारे यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी आतापर्यंत शाळेला श्री अमोलजी सौदागर यांचेकडून एक लाख पंचवीस हजार रुपये देणगी स्वरूपात रंगमंच बांधून देण्याचे काम सुरू झालेले आहे त्याचप्रमाणे श्री रंगराव जी देशमुख यांनी देणगी स्वरूपात एक लाख रुपये किमतीचे भव्य खुले भोजन कक्ष हे काम सुद्धा सुरू झालेले आहे त्याचप्रमाणे श्री दिलीप सेठ राठी यांनी शाळेत आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांना उल्हास वाटावा याकरता तीस हजार रुपये किमतीचा शालेय बगीच्या कामात सुद्धा सुरुवात झालेली आहे, श्री विजय पोहनकर यांनी शाळेला तीन हजार लिटर पाण्याची टाकी देणगी म्हणून दिली आहे हे सांगितले त्याचप्रमाणे श्री प्रवीण भाऊ भोपळे यांचे धाकटे बंधू अमोल महादेवराव भोपळे इंजिनियर पुणे यांचेकडून शाळेतील पंधरा खोल्यांना पडदे देणगी स्वरूपात देण्याचे जाहीर केले आहे.त्याचप्रमाणे श्री सुभाषराव मानकर बुलढाणा- अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था बुलढाणा यांचेकडून शाळेचे ग्रंथालय करीता 400 पुस्तके भेट स्वरुपात देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे ही माहिती दिली आणि सर्व दान कर्ते व शिक्षण प्रेमी मंडळींचे शाळेच्या विकासकामात देणगी स्वरूपातून भरभरून मदत केल्याबद्दल आभार सुद्धा व्यक्त केले. त्यानंतर श्री रंगरावजी देशमुख यांनी मार्गदर्शनपर शाळा विकासाच्यादृष्टीने शाळेला आयएसओ दर्जा प्राप्त करण्यासाठी खेर्डा खुर्द आणि बुद्रुक दोन्ही गावातील नागरिक एकजुटीने पुढे सरसावले आहेत ही एक जमेची बाब आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे अर्थ व बांधकाम सभापती राजेंद्रजी उमाळे यांनी शाळेला ज्या काही गरजा अपूर्ण राहिल्या त्याकरता स्वतः वैयक्तिक भरभरून मदत निधी देण्याचे आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मान्य केले.पंचायत समिती जळगाव जामोद चे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री नारायणराव फाळके यांनी तालुक्यातील उच्च प्राथमिक शाळा पैकी खेर्डा गावातील नागरिकांनी दाखवलेली एकजूट व शाळेकरीता भरभरून मदत निधी सहकार्य करत असल्याबद्दल सर्वप्रथम सर्व शिक्षण प्रेमी व दानशूर व्यक्तींचे शिक्षण विभागातर्फे आभार मानले. शाळा आय एस ओ करण्याच्यादृष्टीने शाळेतील पूर्ण करून करायच्या बाबींबाबत सर्व उपस्थित शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांना मार्गदर्शन केले. शाळेप्रती नागरिकांची एवढी भव्य एकजूट मी प्रथमच अनुभवत आहे असे माननीय फाळके साहेबांनी प्रतिपादन केले. त्यानंतर डॉक्टर शेषरावजी भोपळे यांनी आपल्या भाषणामध्ये सावित्रीबाई फुले यांचे कार्याबद्दल माहिती देऊन खेर्डा गाव पूर्वीपासूनच शैक्षणिक, व्यावसायिक दृष्ट्या जुन्या काळापासून कशाप्रकारे नवनवीन पुढारलेल्या विचारांचे होते त्याच प्रमाणे पन्नास वर्षाच्या अगोदर सध्या मॉल संस्कृती आता बघावयास मिळते ती ग्रामसेवा सोसायटीच्या माध्यमातून विविध प्रकारचे यंत्रे ,कापड आणि इतर दैनंदिन जीवनात करता लागणाऱ्या वस्तू उपलब्ध करून देत असत. त्याचप्रमाणे शाळा विकासाकरता सर्वजण भरभरून देणगी रुपाने मदत करीत आहेत त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास सुद्धा चांगल्या प्रकारे करावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्यानंतर शाळेच्या कार्यालयासमोरील शाळेचे मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणी देणगी स्वरूपात उभारणार आहेत तेथे गावातील उपस्थित सर्व शिक्षणप्रेमी मान्यवर मंडळी आणि प्रवेशद्वाराचे देणगी दाते डॉक्टर शेषरावजी भोपळे यांच्या हस्ते प्रवेशद्वाराचे भूमिपूजन समारंभ पूजन आणि श्रीफळ फोडून आणि कुदळी मारून करण्यात आला. त्याप्रसंगी खेर्डा खुर्द ग्रामपंचायत चे सरपंच श्री गोपाल भाऊ उमरकर, खेर्डा बुद्रुक ग्रामपंचायत चे नवनियुक्त सरपंच श्री नरेश भाऊ वानखडे, आदरणीय श्री रंगराव भाऊ देशमुख-माजीसरपंच , श्री दिलीप सेठ राठी- माजी सरपंच,पंचायत समिती जळगाव जामोद चे माजी सभापती माननीय श्री प्रवीण भाऊ भोपळे,जिल्हा परिषद बुलढाणा चे माजी अर्थ व बांधकाम सभापती श्री राजेंद्र भाऊ ऊमाळे, पोलीस पाटील श्री योगेशभाऊ म्हसाळ, श्री राजाराम जी इंगळे, श्री हनुमंतराव देशमुख, दैनिक सकाळचे पत्रकार श्री गुलाबरावजी इंगळे ,दैनिक लोकमतचे पत्रकार श्री जयदेवभाऊ वानखडे, खेर्डा बुद्रुक व खुर्द चे ग्रामसेवक तीवाले साहेब, पेंटर आनंद खिरोडकार, शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजेंद्रजी तायडे,खेर्डा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री केशरसिंग राऊत आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन गणित विज्ञान शिक्षक श्री पी आर हिस्सल यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पीआर दाभाडे सर यांनी केले.
डॉक्टर शेषरावजी भोपळे दंतरोगतज्ञ, जळगाव जामोद यांच्याकडून जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा खेर्डा बु येथे भव्य प्रवेशद्वार भूमिपूजन समारंभ संपन्न..
जळगांव जा.प्रतिनिधी:-