जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद येथील शेतकऱ्यांनी शेतातील विद्युत डीपी पुन्हा चालू करण्याबाबत दिनांक 12 मार्च रोजी जळगाव जामोद येथील महावितरण कार्यालयाला दिले निवेदन. जळगाव जामोद येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत डीपी महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज बिल न भरल्यामुळे बंद केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे उभे बागायती पीक वाळण्याच्या परिस्थितीत आहे. शेतकऱ्यांच्या जवळ विद्युत पूर्ण विद्युत बिल भरण्याकरिता पैशांची अडचण आहे म्हणून शेतकऱ्यांनी महावितरण ला तीन हजार रुपये भरण्यास तयार आहोत असे निवेदनात नमूद केले आहे तसेच महावितरणने शेतकऱ्यांना एक तृतीयांश बिलाचा भरणा करावा असे संबंधित शेतकऱ्याना सांगितले आहे परंतु आर्थिक परिस्थिती कमजोर असतांना शेतकरी एक तृतीयांश बिल भरू शकत नाहीत त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांन जवळुन तीन तीन हजार जमा करून शेतकऱ्यांच्या डीपी पूर्ववत सुरू करून द्याव्यात. अन्यथा शेतकऱ्यांची उभे पीक सुकून जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापेक्षा दुसरा पर्याय राहणार नाही. त्यामुळे महावितरण विभागाने शेतकऱ्यांच्या विद्युत डीपी चालू करून द्याव्यात याकरिता निवेदन देण्यात आले आहे अन्यथा शेतकरी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिनांक 15 मार्च रोजी आत्मदहन आंदोलन करतील अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांना देण्यात आले आहे निवेदनावर कैलास पाटील, उमेश येऊल, पुंडलिक हिस्सल,गजानन ढगे, अजय वंडाळे, भास्कर हिस्सल, श्रीकृष्ण येउल,पांडुरंग काळपांडे,वसंता काळपांडे, गजानन काळपांडे, ज्ञानेश्वर कोथळकार,पांडुरंग मिसाळ या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.