१० वी आणि १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठि सम्यक विद्यार्थी आंदोलने दिले निवेदन...

जळगांव जामोद प्रतिनिधी :-

संपूर्ण देशात व राज्यात  कोरोना प्राद्रुभामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात आले व १० वी १२ वी चे परिक्षा वेळापत्रक जाहीर झाले आणि ७५%टक्के अभ्यासक्रमावर आधारित परिक्षा घेण्याचे जाहीर केले या निर्णयाचा विरोध म्हणून सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका जळगाव जामोद च्या वतिने शिक्षण मंत्री यांना आज दिनांक दहा मार्च रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांच्या मार्फत निवेदन  देण्यात आले या निवेदनात विद्यार्थ्यांना होत असलेल्या मानसिक त्रास व त्यामुळे बरेच विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग पत्करून आपले जिवन संपवु शकतात त्यासाठी 50%टक्के अभ्याक्रमावर आधारित परिक्षा घेण्यात याव्यात व परिक्षेच्या काळात  कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात नाहितर परिक्षाच घेऊ नये वरिल सर्व प्रकारच्या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशाप्रकारे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका अध्यक्ष अभिषेक बोदडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहित दामोदर, महादेव खरात, अमोल तायडे,विजय अवसरमोल, ऋषिकेश पवार, विपुल तायडे,सह सम्यक विद्यार्थी आंदोलन चर्या पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

Previous Post Next Post