मा. श्री. दयारामजी काळे सभापती, समाज कल्याण समिती, जि. प. अमरावती.दिनांक. 09- 03- 2021 रोजी श्री. दयारामजी काळे यांच्या नेतृत्वाखाली मेळघाटातील सरपंच व कांग्रेसच्या पदाधिकारी याचे शिष्टमंडळ मा. जिल्हाधिकारी श्री. शैलेश नवाल साहेब यांना भेटले.व मेळघाटातील जनतेला रेती (वाळु) त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली.यावर मा. जिल्हाधिकारी यांनी त्वरित रेती घाटाचे लिलाव करून रेती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.तसेच चिखलदरा तालुक्यासाठी मध्य प्रदेशातुन आणल्या जाणारी रेती बाबत मा. तहसीलदार यांना आदेशीत करून आदिवासींची रेतीची गरज पूर्ण केल्या जाईल असे सांगितले.यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते.प्रा. मिश्रीलाल झाडखंडे तालुकाध्यक्ष, चिखलदरा तालुका कांग्रेस कमिटी(ग्रामिण)श्री. राहुल येवले महासचिव, महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस श्री. सहदेव बेलकर तालुका अध्यक्ष, SC सेल
श्री. नानकराम ठाकरे माजी उपसभापती, पं. स. चिखलदरा श्री. महेंद्र मालविय, पत्रकार श्री. राजु भास्करे, श्री. कुणाल मालविय, श्री. अंकुश बेलकर.तसेच सर्वश्री सरपंच श्री. कालु बेठेकर हतरु, श्री. हिराजी जामुनकर रुईपठार, श्री. केंडे सावलकर एकताई, श्री. कालु बेठेकर भांडूम, श्री. लालाजी धिकार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.