जळगांव जा.प्रतिनिधी:-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वक्ता प्रशिक्षण विभागाच्या जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदावर भेंडवळ येथील पंजाबराव वाघ यांची नियुक्ती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वक्ता प्रशिक्षण विभाग बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक अमोल पाटील यांनी दिनांक 6/3 /21 रोजी नियुक्ती पत्रा द्वारे केली आहे. यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जामोद तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तिल युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटना वाढीस यामुळे निश्चित पक्षाला फायदा होईल असे कार्यकर्ते बोलत आहेत.
