मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गुगामल वन्यजीव विभागातील अकोट धारणी मार्गावर खाजगी बस दरीत पडता पडता दोन चाकावर उभी झाल्यामुळे विस प्रवाशी थोडक्यात बचावले. अकोट ते धारणी हा नागमोडीच्या घाटवळाणाचा रस्ता असुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची निघा राखली जाते. या रस्त्याची गुणवत्तेअभावी चाळणी झाली आहे. ८० किलोमीटरचा हा घाट अतिशय धोकादायक वळणाचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याना व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारीकडून कायद्याचा बडगा उगारण्यात वरवर दाखविला जात असला तरी जंगलात रस्ते विकासावर बांधकाम विभागांनी कोट्यावधीचा निधी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून खर्च केला तरीही या रस्त्यांची अवस्था झाली म्हणून मेळघाटातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते जिवघेणे ठरलेले आहे. आदिवासी भागात रोजगाराची कोणतीही साधने उपलब्ध नसल्यामुळे स्थलांतरित कुंटूबे ढाकणा अकोट मार्गाचा वापर करीत आहे. कारण अजमेर काचीकुडा ही रेल्वे मार्गाचे भिजत घोंगडे पडलेले असल्यामुळे या भागातील हजारो मजुरांना धारणी अकोट मार्गावर संपूर्ण मेळघाटवासीयांची भिस्त असल्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करून मार्ग मोकळा करायला पाहिजे होता. सामाजिक बांधकाम विभागाचे आदिवासी भागातील जवळपास सर्वच रस्ते गुणवत्तेअभावी ओबडधोबड झाल्याने प्रवाशांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर अनेक वाहनांचे अपघात झाले त्यात अनेकांना जिव गमवावा लागला असुन काही जणांना अंपग आले. व्याघ्र प्रकल्पाच्या नियमानुसार अतिसंरक्षित जंगलात बांधकामाची कोणतीही कामे करता येत नाही. पण गेल्या पाच सात वर्षात या रस्त्यांवर सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कोट्यावधीचा निधी टप्प्या टप्प्याने खर्च केला पण अकोट धारणी मार्गाचे भाग्य अध्याप फडफडले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. एम एच १२ एच बी १९९९ ही खाजगी बस अकोट वरून धारणीकडे चार वाजता येत होती. पण ढाकणा अकोट मार्गावर ही बस दिडशे फुट खाईत चालकाच्या सतर्कतेने पडता पडता वाचली अन विस प्रवाश्यांचे प्राण वाचले.
अकोट धारणी मार्गावर अवैध वाहतुक...
अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करे.
