पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी पक्षी वाचविणे जरूरी- डॉक्टर गजाननराव मुंडे.मातृशक्ती संघटना व युवा ब्रिगेड तर्फे पक्षी बचाव मोहीमेला प्रारम्भ..


 शेगाव प्रतिनिधी:-

पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी पर्यावरणा सोबतच पक्ष्यांना वाचविणे सुद्धा अत्यंत जरुरीचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री संत गजानन महाराज निवासी मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर गजाननराव मुंडे सर यांनी येथे केले स्थानिक गौलखेड रोडवर असलेल्या सावली सेवा प्रकल्प च्या आवारामध्ये मातृशक्ती संघटना व युवा ब्रिगेड च्या संयुक्त विद्यमाने पक्षी बचाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला यावेळी पक्ष्यांसाठी दाना आणि पाणी यासाठी विविध झाडावर दाना पात्र आणि पाणी पात्र लावण्यात आले रखरखत्या उन्हात पक्ष्यांसाठी दाना आणि पाणी उपलब्ध व्हावे याकरिता देशपातळीवर कार्यरत असलेल्या मातृशक्ती संघटना व युवा ब्रिगेडच्या माध्यमातून संपूर्ण उन्हाळ्यामध्ये घरोघरी पक्षी बचाव मोहिमेअंतर्गत पक्ष्यांसाठी दाणा आणि पाणी पात्राचे वितरण करून पक्षी बचाव साठी जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ मुक्ताताई ठाकूर मॅडम यांनी उपस्थितांना दिली कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने घोषित केलेल्या नियमांचे कडेकोट पालन करुन तसेच सोशल डिस्टंसिंग आणि मास्क लावून 15 मार्च रोजी आयोजित या पक्षी बचाव मोहिमेचे उद्घाटन महान समाजसेवक बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून संतनगरी शेगाव शहरात साकार झालेल्या गौलखेड रोडवरील सावली सेवा प्रकल्प परिसरामध्ये डॉक्टर गजाननराव मुंडे सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावली सेवा प्रकल्पाचे सर्वेसर्वा प्रशांत देशमुख सर हे तर प्रमुख म्हणून प्रेस क्लब शेगावचे माजी सचिव संजय त्रिवेदी मातृशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सौ वैशाली ताई तायडे राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ रुपाली ताई वानखडे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मुक्ताताई ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गजानन महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आल उपस्थित सर्वांनी जोडो जोडो भारत जोडो हे बाबा आमटे यांच्या यांनी सांगितलेली प्रेरणादायक प्रार्थना म्हटल्याने कार्यक्रमामध्ये नवचैतन्य निर्माण झालेले दिसत होते याप्रसंगी संजय त्रिवेदी सौ वैशाली ताई तायडे सौ रूपाली वानखडे मातृशक्ती संघटनेच्या अमरावती विभाग अध्यक्ष अलका चंद जिल्हाध्यक्ष सौ रेखा शेळके जळगाव जामोद तालुका मातृशक्ती संघटनेचे अध्यक्ष माधुरी शर्मा यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख सर यांनी सांगितले की आज चोहोबाजूने कॉंक्रिटीकरण मोठ्या प्रमाणात होत असून बेसुमार वृक्षतोड झालेली आहे त्यामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक निवास्थान उध्वस्त झाल्याने पक्ष्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे .पक्षी वाचविण्यासाठी मातृशक्ती संघटनेच्या महिलां सोबतच युवा ब्रिगेड च्या मुलीसुद्धा पुढे आल्या आहेत हे पाहून  खरोखर मातृशक्ती संघटनेच्या महिला भगिनी व युवा ब्रिगेड च्या मुलींचे  कौतुक करावे तितके थोडेच आहे सावली सेवा प्रकल्प च्या माध्यमातून सुद्धा शक्य तेवढी मदत व सहकार्य करण्यास मी नेहमीच तत्पर राहील असेही प्रशांत देशमुख सर यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी युवा ब्रिगेडच्या कुमारी रक्षा भारंबे पाटील कुमारी रेणुका तायडे कुमारी कुसुम चव्हाण प्रेस क्लब शेगाव चे प्रशांत खत्री राजकुमार व्यास सावली सेवा प्रकल्पातील दुर्गा मुक्ता यांच्यासह तेथील सर्व बंधू बांधव उपस्थित होते . जोडो जोडो भारत जोडो.. भारत माता की जय.. इत्यादी घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post Next Post