मानहानीकारक सक्तीची विज बिल वसुली थांबवा या मागणीसाठी आज दिनांक 15 मार्च रोजी एल्गार संघटनेचे सर्वेसर्वा प्रसेंजित पाटील यांनी दिले महावितरण जळगांव जा.मार्फत निवेदन.सक्तिची विजबिल वसूली थांबवा अन्यथा महावितरणच्या कर्मचार्यांना जळगाव जामोद तालुक्यातील कुठल्याच गावात पाय ठेऊ देणार नाही - प्रसेनजीत पाटिल* (संस्थापक अध्यक्ष एल्गार संघटना .कोरोनाच्या महामारीमुळे जनता आर्थिक डबघाईस आलेली आहे अश्या परिस्थितीत सुद्धा महाराष्ट्र शासन व विज कंपन्या जनतेला विजबीला मध्ये कुठलीच सवलत द्यायला तयार नाही. त्यातच अधिवेशनात विज कनेक्शन कापल्या जाणार नाही अशी घोषणा राज्य शासनाच्या वतीने केल्या गेली. परंतु अधिवेशन संपल्या संपल्या विजबीलाची सक्तिची वसूली महावितरणच्या कर्मचारांनी चालू केली त्यामुळे जनतेत प्रचंड रोष आहे. आर्थिक डबघाईस आलेल्या जनतेला त्रास देण्याच काम जर होत असेल तर येत्या काळात जनता व कर्मचारी यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने विजबीलाची सक्तिची वसूली त्वरित थांबवावी अन्यथा एल्गार संघटनेच्या वतीने येत्या १७ मार्च पासून अतिशय तीव्र आंदोलन चालू करत विजवितरण कंपनीच्या कर्मचार्यांना जळगाव जामोद तालुक्यातील कुठल्याच गावात पाय ठेऊ देणार नाही अश्या प्रकारचे निवेदन अधीक्षक अभियंता विज वितरण कंपनी बुलढाणा यांना उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत देण्यात आले.
सक्तिची विजबिल वसूली थांबवा अन्यथा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जळगाव जामोद तालुक्यातील कुठल्याच गावात पाय ठेऊ देणार नाही - प्रसेनजीत पाटिल.
जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.