फेसबुकवर मैत्री करून युवकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,मुलीला गर्भधारणा!आरोपी गजाआड


 शेगाव ता.प्रतिनिधी:-

शेगाव येथे फेसबुक वरून १६ वर्षीय अल्पवयीन मुली सोबत मैत्री करून तिच्यावर शेगाव येथील लॉज मध्ये  बलात्कार केल्याप्रकरणी टाकळी विरो येथील आरोपी विरुद्ध  गुन्हा दाखल करून  त्याला शेगाव पोलिसांनी अटक केली याबाबत शेगाव शहर पोलीस स्टेशन सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार टाकळी विरो येथील आरोपी असलेला अतुल नारायण साठे या वीस वर्षीय युवकाने फेसबुकच्या माध्यमातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुली सोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले ९ मार्च २०२० पासून तर ९ मार्च २०२१ यादरम्यान आरोपीने अल्पवयीन मुलीला शेगाव येथील मंदिराजवळील एका खाजगी लॉजवर नेऊन तिच्यासोबत वारंवार बलात्कार केला. तिची छाती दुखत असल्याने तिने तिच्या आईला याबाबत सांगितले आईने तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले त्यामुळे पिडीतेच्या आईला धक्काच बसला. आईने विचारणा केल्यावर मुलीने अतुल साठे याने तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याची आपबिती कथन केली. बालकल्याण समितीने मुलीचा जबाब नोंदविल्यानंतर शेगांव पोलिसांनी अतुल नारायण साठे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ सहकलम (६) पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली व न्यायालयात हजर केले न्यायालयाने आरोपीला १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कमलेश खंडारे करीत आहेत.

Previous Post Next Post